Cricket World Prize Money: 1983 मध्ये वर्ल्ड कप विजेत्या टीमला किती मिळाली होती बक्षिसाची रक्कम?
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
Cricket World Prize Money: खेळाडूंना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र, तेव्हाही बीसीसीआयने पैशांची व्यवस्था करून खेळाडूंना रोख बक्षीस दिलं होतं.
मुंबई : भारतीय क्रिकेट टीमने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकल्यानंतर या टीमचं सर्वत्र अभिनंदन होतंय. या टीममधील खेळाडूंना बीसीसीआयने मोठी रक्कम बक्षीस म्हणून जाहीर केलीय. पण तुम्हाला माहिती आहे का, 1983 मध्ये भारताने जेव्हा पहिल्यांदा वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता, तेव्हा बीसीसीआयची अवस्था खूपच वाईट होती. खेळाडूंना देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र, तेव्हाही बीसीसीआयने पैशांची व्यवस्था करून खेळाडूंना रोख बक्षीस दिलं होतं.
advertisement
advertisement
पंतप्रधान मोदींनी घेतली खेळाडूंची भेट भारतीय टीम मायदेशी परतल्यावर त्यांचं जंगी स्वागत झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंची भेट घेतली. त्यानंतर 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीमचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय टीमनं लॉर्ड्सवर वेस्ट इंडिजचा पराभव करून क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला होता.
advertisement
बीसीसीआयकडे नव्हता पैसा 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकून मायदेशी परतल्यावर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी भारतीय टीमचं स्वागत केलं होतं. तर तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांनीही खेळाडूंची भेट घेतली होती. पण तेव्हा टीमला किती रोख बक्षीस मिळालं होतं, हे समजल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण बीसीसीआयकडे त्यावेळी पैसेच नव्हते.
advertisement
संगीत कार्यक्रमाचे केले आयोजनकपिल देव यांच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून भारतामध्ये आली, तेव्हा बीसीसीआयकडे पैसे नव्हते. पण खेळाडूंना काहीतरी देण्याची बीसीसीआयची इच्छा होती. त्यावेळी एनकेपी साळवे बीसीसीआयचे अध्यक्ष होते. त्यांनी लता मंगेशकर यांच्याकडे जाऊन खेळाडूंसाठी पैसा उभा करण्यासाठी दिल्लीत संगीत कार्यक्रम करण्याची विनंती केली. लतादीदींनीही लगेच होकार दिला.
advertisement