Team India : 'मला कॅप्टन व्हायचंय...', मॅचआधीच टीम इंडियाच्या खेळाडूचं गिलला ओपन चॅलेंज!

Last Updated:
मागच्या 16 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करू न शकलेल्या शुभमन गिलवरचा दबाव वाढत आहे, त्यातच आता भारतीय खेळाडूने टीम इंडियाचा कर्णधार व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.
1/7
बीसीसीआय, निवड समिती आणि भारतीय टीम मॅनेजमेंट मागच्या काही काळापासून शुभमन गिलला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणून तयार करत आहे.

advertisement
2/7
गिलला भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचं नेतृत्व आधीच देण्यात आलं आहे, तर टी-20 टीममध्ये गिल उपकर्णधार आहे. पण गिलचा टी-20 क्रिकेटमधला सध्याचा फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. टेस्ट आणि वनडेमध्ये रन करणारा शुभमन गिल टी-20 क्रिकेटमध्ये संघर्ष करत आहे.

3/7
गिल टेस्ट क्रिकेटमध्ये 70 पेक्षा जास्तची सरासरी आणि वनडेमध्ये 49 च्या सरासरीने रन करत आहे, पण टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलची सरासरी फक्त 26.3 आहे.

4/7
मागच्या 16 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये गिलला एकही अर्धशतक करता आलेलं नाही. संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल रेसमध्ये असल्यामुळे गिलवरचा दबाव वाढत चालला आहे.

5/7
एकीकडे गिलची टी-20 क्रिकेटमधली कामगिरी निराशाजनक होत असतानाच आता त्याच्या कॅप्टन्सीलाही थेट आव्हान देण्यात आलं आहे. आपल्यालाही टीम इंडियाची कॅप्टन्सी करायची असल्याचं वक्तव्य टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने केलं आहे.

6/7
भविष्यात तू टीम इंडियाचा कर्णधार होऊ शकतोस का? असा प्रश्न यशस्वी जयस्वालला विचारण्यात आला. तेव्हा त्याने 'हो नक्कीच. मी कर्णधार होऊ शकतो, का नाही? मी कठोर मेहनत करत राहीन. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा या गोष्टी होतील', असं जयस्वाल म्हणाला आहे.

7/7
'माझं स्वप्न टी-20 वर्ल्ड कप खेळण्याचं आहे. मी खेळावर लक्ष केंद्रीत करत आहे आणि योग्य वेळेची वाट पाहत आहे', अशी प्रतिक्रिया जयस्वालने दिली. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप विजेत्या टीममध्ये जयस्वाल होता, पण रोहित आणि विराट ओपनिंगला खेळत असल्यामुळे जयस्वालला संधी मिळाली नाही.

Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement