advertisement

IND vs SA : जागा एक, पण चौघांची मारामारी, Playing XI निवडताना गंभीरचंही ऐकणार नाही नवा कॅप्टन!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज गमावल्यानंतर आता टीम इंडिया वनडे सीरिजमध्ये बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल. दोन्ही टीममध्ये रविवार 30 नोव्हेंबरपासून 3 वनडे मॅचच्या सीरिजला सुरूवात होत आहे.
1/6
वनडे सीरिजसाठी टेस्ट सीरिज खेळलेल्या 7 खेळाडूंना बाहेर करण्यात आलं आहे. बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप, अक्षर पटेल, देवदत्त पडिक्कल आणि साई सुदर्शन यांची वनडेसाठी निवड झालेली नाही, तर शुभमन गिलला दुखापत झाली आहे.

2/6
गिलच्या गैरहजेरीमध्ये केएल राहुलला टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे. पहिल्या वनडेसाठीची प्लेइंग इलेव्हन जवळपास निश्चित असली तरी चौथ्या क्रमांकाच्या एका जागेसाठी चार खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. यातल्या फक्त एकाच खेळाडूला पहिल्या सामन्यात मैदानात उतरण्याची संधी मिळेल.

3/6
पहिल्या वनडेमध्ये रोहित शर्मासोबत यशस्वी जयस्वाल ओपनिंग करेल आणि तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळेल, हे निश्चित मानलं जात आहे, पण खरी डोकेदुखी ही चौथ्या क्रमांकाची ठरणार आहे, कारण कॅप्टन केएल राहुलने आपण सहाव्या क्रमांकावर फिनिशर म्हणून खेळू, असं स्पष्ट केलं आहे.

4/6
चौथ्या क्रमांकासाठी टीम मॅनेजमेंटकडे तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल हे पर्याय आहेत, यातल्या ध्रुव जुरेलला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. तसंच पंत खेळला तर तो विकेट कीपर म्हणून खेळेल, असं केएल राहुलने सांगितलं आहे.

5/6
चौथ्या क्रमांकानंतर पाचव्या क्रमांकावर जडेजा, सहाव्या क्रमांकावर केएल राहुल, सातव्यावर वॉशिंग्टन सुंदर आणि आठव्यावर नितीश रेड्डीला संधी मिळू शकते, यामुळे टीममध्ये 3 ऑलराऊंडर आणि 6 बॉलिंगचे पर्याय उपलब्ध होतील.

6/6
फास्ट बॉलिंगची जबाबदारी अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांच्यावर असेल, तर कुलदीप यादव हा स्पेशलिस्ट स्पिन बॉलिंगचा एकमेव पर्याय आहे. एखादा ऑलराऊंडर कमी करायचा असेल तर तिसरा फास्ट बॉलर म्हणून प्रसिद्ध कृष्णाचाही विचार होऊ शकतो.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement