IND vs SA : 'या चौघांना आधी ड्रेसिंग रूममधून हाकला...' आता 5 खेळाडूंची एन्ट्रीच टीम इंडियाला वाचणार!

Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. यानंतर आता गुवाहाटीच्या दुसऱ्या टेस्टमध्येही टीम इंडिया पराभवाच्या छायेत सापडली आहे. यानंतर आता टीम इंडियात तातडीने बदल करण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे.
1/6
टीम इंडियाची मागच्या वर्षभरातली कामगिरी पाहता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी द्या, अशी मागणी चाहते करत आहेत. साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, नितीशकुमार रेड्डी, ऋषभ पंत यांची हकालपट्टी करण्याची मागणी चाहते करत आहेत.

advertisement
2/6
अभिमन्यू इश्वरन हा 2020 पासून टीम इंडियासोबत होता, पण त्याला एकदाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. अखेर एकही मॅच न खेळता इश्वरन टीममधून बाहेर झाला. अभिमन्यू इश्वरनने 173 प्रथम श्रेणी इनिंगमध्ये 48.87 च्या सरासरीने 7,674 रन केल्या आहेत, ज्यात 27 शतकं आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे.

3/6
दुसरीकडे सरफराज खानने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 82 इनिंगमध्ये 65.61 च्या सरासरीने 4,593 रन केले ज्यात 16 शतकं आणि 14 अर्धशतकं आहेत. भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही सरफराजला बाहेर केलं गेलं.

4/6
ऋतुराज गायकवाड यानेही महाराष्ट्राकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. ऋतुराजने 43 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 45.59 च्या सरासरीने 3,146 रन केले आहेत. ऋतुराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 9 शतकं आणि 16 अर्धशतकंही केली आहेत.

5/6
2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलनंतर टीमबाहेर गेलेला अजिंक्य रहाणे मुंबईकडून धमाकेदार कामगिरी करत आहे. यंदाच्या रणजी ट्रॉफीमध्येही रहाणेने मोठे स्कोअर केले आहेत, पण निवड समिती मात्र रहाणेचा विचार करताना दिसत नाहीये.

6/6
मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या रजत पाटीदारनेही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. पाटीदारने 74 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 45.78 च्या सरासरीने 5,448 रन केले, ज्यात 16 शतकं आणि 27 अर्धशतकं आहेत, पण तरीही त्याची भारताच्या टेस्ट टीममध्ये निवड केली जात नाहीये.

Dharmendra News:  धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून,  हे खास गुपित!
धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित
  • धर्मेंद्र यांनी ६० वर्षापूर्वी खरेदी केलेली कार, आजही ठेवलीय जपून, हे खास गुपित

View All
advertisement