advertisement

Team India : नवे आहेत पण छावेत आहेत! भारताचे 'हे' 5 खेळाडू पहिल्यादा टी20 वर्ल्ड कप खेळणार

Last Updated:
टीम इंडियाने जाहीर केलेल्या स्क्वॉडमधील 8 खेळाडू असे आहेत, ज्यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वात टी20 वर्ल्ड कप खेळला होता. तर पाच खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप खेळणार आहेत.
1/7
येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कपला सूरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाने त्याचं 15 सदस्यीय स्क्वॉड जाहीर केला आहे.

2/7
टीम इंडियाने जाहीर केलेल्या स्क्वॉडमधील 8 खेळाडू असे आहेत, ज्यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वात टी20 वर्ल्ड कप खेळला होता. तर पाच खेळाडू असे आहेत, जे पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कप खेळणार आहेत. त्यामुळे हे खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

3/7
पहिल्या खेळाडूबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाचा स्फोटक ओपनर अभिषेक शर्मा आहे.अभिषेक शर्मा पहिल्यांदाच सीनियर स्टेजवर वर्ल्डकप खेळणार आहे. जुलै 2024 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा अभिषेक तेव्हापासून टीम इंडियाचा सातत्यपूर्ण सदस्य आहे.

4/7
रिंकू सिंग हा टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा नवा फिनिशर म्हणून उदयास आला आहे. रिंकूने 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. 28 वर्षीय या खेळाडूने 40 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 161.05 च्या स्ट्राईक रेटने 641 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

5/7
तिलक वर्मा हा भारतीय टी20 संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. टी20 वर्ल्डकपमध्ये खेळण्याची ही त्याची पहिलीच वेळ असेल. विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर, तिलकला तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरवण्यात आले आहे. तो या स्थानावर अपवादात्मकपणे चांगली फलंदाजी करत आहे. 2023 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या तिलकने 40 सामन्यांमध्ये 144.09 च्या स्ट्राईक रेटने 1183 धावा केल्या आहेत.

6/7
वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अष्टपैलू खेळाडूमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. 2017 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सुंदर पहिल्यांदाच 
वर्ल्डकप खेळणार आहे. डावखुरा फलंदाज असलेल्या या फलंदाजाने भारतासाठी 58 टी20 सामन्यांमध्ये 51 बळी घेतले आहेत, तर नऊ डावांमध्ये 254 धावा केल्या आहेत.
वॉशिंग्टन सुंदर टीम इंडियाच्या वर्ल्ड कप अष्टपैलू खेळाडूमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. 2017 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सुंदर पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणार आहे. डावखुरा फलंदाज असलेल्या या फलंदाजाने भारतासाठी 58 टी20 सामन्यांमध्ये 51 बळी घेतले आहेत, तर नऊ डावांमध्ये 254 धावा केल्या आहेत.
advertisement
7/7
वेगवान गोलंदाज हर्षित राणा हा वर्ल्डकपमध्ये  टीम इंडियासाठी एक्स-फॅक्टर ठरू शकतो. तो त्याच्या गोलंदाजीने सुरुवातीच्या विकेट घेण्यास सक्षम आहे आणि खालच्या क्रमात आक्रमक फलंदाजी देखील करतो. राणाने नऊ टी20 सामन्यांमध्ये 9 विकेट घेतले आहेत. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना राणाकडून मोठ्या आशा आहेत.

Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement