advertisement

Lock Up 2: कंगना रणौत पुन्हा रिॲलिटी शोमध्ये झळकणार, 'लॉकअप'च्या आगामी सीझन घोषणा

Last Updated:

मंडी लोकसभेच्या खासदार आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनयापासून गायब असलेल्या कंगना रणौतचा प्रेक्षकांच्या भेटीला ओटीटीवर नवा शो येतोय.

News18
News18
मंडी लोकसभेच्या खासदार आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनयापासून गायब असलेल्या कंगना रणौतचा प्रेक्षकांच्या भेटीला ओटीटीवर नवा शो येतोय. लॉकअपचा पहिला सीझन गाजल्यानंतर आता लॉकअप वेब शोचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल चार वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर अभिनेत्री ओटीटी माध्यमातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक आता कंगना रणौतच्या अपकमिंग शोसाठी उत्सुक आहेत.
मंगळवारी मुंबईमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये कंगना रणौतच्या 'लॉकअप 2' या शोचा सुद्धा समावेश होता. या यादीमध्ये अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आणि निर्माती एकता कपूर यांचाही समावेश होता. चार वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर 'लॉकअप'चा दुसरा सीझन येणार आहे. तो ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ऑनलाइन स्ट्रीम केला जाणार आहे. खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत या रिॲलिटी शोचं सुत्रसंचालन करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आता कंगना खासदार झाल्या आहेत, त्यामुळे त्या सुत्रसंचालन करणार आहेत की नाही, हे अद्याप समोर आलेलं नाही.
advertisement
3 फेब्रुवारीच्या दिवशी, नेटफ्लिक्सकडून 'लॉकअप 2' च्या रिलीजची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. हा रिअॅलिटी शो पहिल्यांदा 2022 मध्ये अल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात आला होता. अभिनेत्री कंगना राणौतने 71 भागांचा पहिला सीझन होस्ट केला होता आणि तिच्या होस्टिंगला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आता फार मोठ्या ब्रेकनंतर 'लॉकअप 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कंगना रणौत एकता कपूरचा रिअॅलिटी शो होस्ट करेल का, सध्या, या प्रकरणावर कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. शिवाय, लॉक अप सीझन २ ची रिलीज तारीख जाहीर केलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Lock Up 2: कंगना रणौत पुन्हा रिॲलिटी शोमध्ये झळकणार, 'लॉकअप'च्या आगामी सीझन घोषणा
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement