advertisement

Imran Khan: लग्नाच्या 8 वर्षांनंतरच मोडला संसार, पहिल्यांदाच इम्रान खानने सांगितलं घटस्फोटाचं कारण

Last Updated:

आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान जवळपास 11 वर्षे अभिनयापासून दूर होता. अभिनेता बराच काळ अभिनयापासून दूर असला तरी, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अजूनही चर्चेत आहे.

News18
News18
मुंबई: आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान जवळपास 11 वर्षे अभिनयापासून दूर होता. त्यानंतर तो आता 'हॅप्पी पटेल' चित्रपटातून पुन्हा पदार्पण करत प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. इम्रान खान बराच काळ अभिनयापासून दूर असला तरी, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अजूनही चर्चेत आहे. त्याने त्याच्या आयुष्यात बरेच चढ-उतार जवळून पाहिले आहेत, त्यामध्ये डिप्रेशन आणि त्याची बायको अवंतिका मलिकसोबतचा घटस्फोट यांचा समावेश आहे. आज, इम्रान खान सिंगल पॅरेंट्स आहे आणि तो त्याच्या मुलीची एकटाच काळजी घेतो. त्याने कधीही नॅनीची नेमणूक केली नाही, तो स्वत: मुलीचा टिफिन पॅक करतो आणि तिला शाळेत सोडवतो. इम्रान खानने पत्नी अवंतिकासोबतच्या घटस्फोटाची कारणे सविस्तरपणे सांगितले.
इम्रान खानने, ई- टाइम्सशी बोलताना सांगितले की, मला 2016 मध्ये, काहीतरी गडबड आहे. याची पहिली जाणीव झाली. तेव्हा मी अवंतिकासोबत राहत होतो. मला जसे वाटत होते, तसं जाणवत नव्हतं. मी भीती आणि चिंतेने जगाशी संवाद साधत होतो. माझ्या मनाला आणि मला वाटत होतं की, मी शांत आहे. पण आतून, मी पूर्णपणे तुटलो होतो. जेव्हा मी हे पाहिलं, तेव्हा मला जाणवले की, मी जी माझी इमेज घेऊन जगतोय ती खरी नाही आणि मला ती बदलायची होती. 2016 मध्ये मी माझ्या मानसिक आरोग्यावर काम करायला सुरुवात केली आणि त्यावरच मी लक्ष केंद्रित केले. याच काळात मला जाणवलं की जोडीदारासोबत म्हणजेच त्यांच्या पत्नीसोबतचे त्यांचे नाते अस्वस्थ आहे."
advertisement
इम्रान पुढे म्हणाला की, "आम्ही रिलेशनमध्ये खूप लहान वयात आलो होत. नात्यातील चांगले आणि वाईट समजून घेण्यासाठी आमच्याकडे पुरेसा अनुभव नव्हता. जसजसे मी अधिक समजून घेऊ लागलो तसतसे मला जाणवले की आम्ही अशा चक्रात अडकलो आहोत जे आपण तोडू शकत नाही. कोणताही बदल करण्यासाठी आमच्या दोघांकडून प्रयत्न करावे लागतात आणि ते घडत नव्हते. मला जाणवले की स्वतःला सर्वात निरोगी ठेवण्यासाठी मला या नात्यातून बाहेर पडावे लागेल." जेव्हा इम्रान खानने त्याची पत्नी अवंतिका मलिक हिला घटस्फोट देण्याचे कारण त्याचे मानसिक आरोग्य आहे, परंतु अभिनेता त्याला जबाबदार धरत नाही. इम्रान म्हणाला की मी वेगळे होण्याचा निर्णय माझ्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचे कारण नाही.
advertisement
स्वतःच्या उपचारांसाठी मी पत्नीकडून घटस्फोट घेतला. अभिनेता पुढे म्हणाला की, "मी कोणालाही दोष देत नाही. मी लोकांच्या नजरेतून दूर राहिलो आहे. माझ्या अनुपस्थितीत, अफवा, गप्पा, नको त्या चर्चा पसरल्या होत्या आणि गोष्टी गुंतागुंतीच्या झाल्या. घटस्फोटामुळे माझी प्रकृती आणखी बिकट झाली असे अनेकांना वाटत होते. पण प्रत्यक्षात, माझ्या वैवाहिक आयुष्यातील शेवटची काही वर्षे सर्वात वाईट होती. तो संपवण्याचा निर्णय माझ्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यामुळे मला बरे होण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळाली. आमच्यात कोणतीही सुसंगतता नव्हती. आम्ही एकमेकांना सर्वोत्तम बनण्यासाठी आधार देऊ शकलो नाही."
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Imran Khan: लग्नाच्या 8 वर्षांनंतरच मोडला संसार, पहिल्यांदाच इम्रान खानने सांगितलं घटस्फोटाचं कारण
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement