advertisement

Pune : पुणे एक्स्प्रेस वेवर आणखी एक मोठा अपघात, कंटेनर पेट्रोल टँकरला धडकला, घटनास्थळाचा पहिला VIDEO

Last Updated:

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. टोनी धाब्याजवळ हा अपघात झाला आहे.

News18
News18
पुणे : मुंबई पुणे एक्स्प्रेसवर मागील २८ ते ३० तासांपासून अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी झाली आहे. आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील टँकर पलटी झाला आहे. टँकरमध्ये गॅस गळतीमुळे मुंबईकडे येणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. एकीकडे युद्धपातळीवर अपघातग्रस्त टँकर हटवण्याचं काम सुरू आहे, तर दुसरीकडे आता पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पेट्रोलने भरलेल्या टँकरला अपघात झाला. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बुधवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. टोनी धाब्याजवळ हा अपघात झाला आहे. पेट्रोलचा टँकर आणि एका भरधाव कंटेनर धडकला. हा अपघात इतका भीषण होता की, पेट्रोलचा टँकर हा महामार्गावरून  खाली उतरला. या अपघातात दोन्ही पेट्रोलच्या टँकरचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर कंटेनरच्या केबिनचंही मोठं नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. मात्र, पेट्रोलने भरलेला टँकर असल्यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली आहे.
advertisement
मात्र, या अपघातामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर पुण्याकडे जाणाऱ्याा वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त पेट्रोलचा टँकर आणि कंटेनर हटवण्याचं काम सुरू आहे.
१२ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होणार 
दरम्यान, आडोशी बोगद्याजवळ अजूनही गॅस गळती टँकरमधून  गॅस दुसऱ्या टँकरमध्ये शिफ्ट करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. या कंटेनरमध्ये १२ टन गॅस असल्याची माहिती समोर आला आहे. एकूण ४ टँकरमध्ये हा गॅस भरला जाणार आहे. रात्री ८ वाजपर्यंत २ टँकरमध्ये गॅस भरलाा आहे. आणखी २ टँकरमध्ये गॅस भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे. दरम्यान,  याठिकाणी मदतकार्य करणाऱ्यांना लोणावळा मुस्लिम समाजाच्या तरूणांनी बिस्किट,पाणी आणि नाष्टा वाटप करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुणे एक्स्प्रेस वेवर आणखी एक मोठा अपघात, कंटेनर पेट्रोल टँकरला धडकला, घटनास्थळाचा पहिला VIDEO
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement