विराट कोहली देतोय मेस्सी, रोनाल्डोला टक्कर, फुटबॉलवेड्या शहरात क्रिकेटचा फिव्हर

Last Updated:
क्रीडा क्षेत्राचा विचार करता कोल्हापूर हे कुस्तीसोबत फुटबॉलसाठीही प्रसिद्ध आहे. मात्र याच कोल्हापुरात आता क्रिकेट फिव्हर दिसतोय.
1/7
  म्हटलं की लाल मातीतील कुस्ती आठवते. पण 'क्रिकेटवेड्या भारत देशात फुटबॉलवेडं शहर' अशी कोल्हापूरची एक विशेष ओळख आहे.
कोल्हापूर म्हटलं की लाल मातीतील कुस्ती आठवते. पण 'क्रिकेटवेड्या भारत देशात फुटबॉलवेडं शहर' अशी कोल्हापूरची एक विशेष ओळख आहे.
advertisement
2/7
फुटबॉल हा अवघ्या कोल्हापूरकरांचा सर्वात आवडता खेळ आहे. त्यामुळेच लिओनेल मेस्सी, रोनाल्डो यांची क्रेझ कोल्हापुरात नेहमीच दिसते. तसेच त्यांचे मोठेमोठे होर्डिंगही दिसतात.

3/7
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेवेळी तर कोल्हापूरकरांनी नानाविध प्रकारे आपले फुटबॉल प्रेम व्यक्त केले होते. त्याची देशभर चर्चाही होत असते.

4/7
कोल्हापुरात कुणी मेस्सी समर्थकांनी फुटबॉलपटू मेस्सीचे उंचच उंच कट आऊट लावले होते. तर कोणी रोनाल्डोचे कट आऊट लाऊन आपले फुटबॉलप्रेम व्यक्त केले होते.

5/7
भारतात विश्वचषक सामने सुरू असताना या फुटबॉल वेड्या शहरातही क्रिकेटचा फिव्हर दिसत आहे. येथील काही क्रिकेटप्रेमींनी मेस्सी, रोनाल्डो प्रमाणेच विराट कोहलीचे 15 फुटी कट आऊट उभारले आहे.

6/7
कोल्हापुरातील विराट कोहलीच्या चाहत्यांनी निवृत्ती चौक परिसरात कोहलीचा 15 फुटांचा कटआउट उभारला आहे. कै. राणा गायकवाड स्पोर्ट्स यांच्या वतीने हा कटआऊट उभारण्यात आला आहे.

7/7
यंदाचा क्रिकेट विश्वचषक जिंकून भारतीय संघाने 2011 ची पुनरावृत्ती करावी, यासाठी हा कटआउट उभारून भारतीय संघाला शुभेच्छा देण्यात आल्याचे क्रिकेटप्रेमींनी सांगितले आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement