Dhurandhar 2 : रणवीरच्या चाहत्यांना झटका! ऐनवेळी 'धुरंधर २' चे शो रद्द, रिलीजच्या दिवशीच राडा, नेमकं कारण काय?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Dhurandhar 2 : दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या बहुचर्चित 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच मोठा गदारोळ पाहायला मिळाला. निर्मात्यांनी आखलेली 'पेड प्रिव्ह्यूज'ची नवी रणनीती तांत्रिक अडचणींमुळे फसल्याचे दिसून आले.
मुंबई: दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंह यांच्या बहुचर्चित 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाच्या रिलीजपूर्वीच मोठा गदारोळ पाहायला मिळाला. निर्मात्यांनी आखलेली 'पेड प्रिव्ह्यूज'ची नवी रणनीती तांत्रिक अडचणींमुळे फसल्याचे दिसून आले. दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये ऐनवेळी शो रद्द करावे लागले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या चाहत्यांनी काही चित्रपटगृहांबाहेर राडा केल्याचे वृत्त आहे.
सेन्सॉर बोर्डाचे 'ए' प्रमाणपत्र आणि शेवटच्या क्षणी बदल
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाने (CBFC) चित्रपटाला 'A' (प्रौढांसाठी) प्रमाणपत्र देताना काही दृश्ये आणि संवादांवर कात्री चालवण्याचे आदेश दिले होते. सेन्सॉरने सुचवलेले हे बदल सर्व भाषांमधील प्रिंट्समध्ये समाविष्ट करण्यासाठी निर्मात्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही. परिणामी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषेतील प्रिंट्स वेळेत चित्रपटगृहांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत.
advertisement
काही ठिकाणी याच तांत्रिक कारणास्तव 'धुरंदर-२' चे शो उशिराने सुरू झाल्याची माहिती सोशल मीडियावर चाहत्यांनी पोस्ट केली आहे.
दक्षिण भारतात चाहत्यांची मोठी निराशा
विशेषतः तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये या चित्रपटाची मोठी उत्सुकता होती. चाहत्यांनी प्रदर्शनापूर्वीच 'पेड प्रिव्ह्यूज'साठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग केले होते. मात्र, शो सुरू होण्यापूर्वी अवघ्या काही तास आधी शो रद्द झाल्याचा निरोप मिळाल्याने प्रेक्षकांच्या आनंदावर विरझण पडले. शेवटच्या क्षणी घेतलेल्या या निर्णयामुळे संतप्त चाहत्यांनी थिएटर प्रशासनाला धारेवर धरले.
advertisement
We regret to inform that the Tamil paid previews of Dhurandhar: The Revenge scheduled for today have been cancelled. Refunds will be initiated shortly. Thank you for your patience.#DhurandharTheRevenge #AGSCinemas pic.twitter.com/VCLjbJ6GdN
— AGS Cinemas (@agscinemas) March 18, 2026
advertisement
रिफंड मिळणार....
तामिळनाडूतील एका प्रमुख मल्टिप्लेक्सने सोशल मीडियावर अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार, ज्या ठिकाणी तांत्रिक कारणास्तव 'धुरंधर २'चे पेड प्रिव्ह्यू रद्द करण्यात आले, त्या ठिकाणी प्रेक्षकांना फंड मिळणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, हिंदी भाषेतील काही निवडक ठिकाणचे प्रिव्ह्यू पार पडले असले तरी, दाक्षिणात्य राज्यांमधील या गोंधळामुळे चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 'धुरंदर-२' ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा अंदाज आहे. ईदच्या वीकेंडचा फायदादेखील चित्रपटाला होऊ शकतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 8:03 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Dhurandhar 2 : रणवीरच्या चाहत्यांना झटका! ऐनवेळी 'धुरंधर २' चे शो रद्द, रिलीजच्या दिवशीच राडा, नेमकं कारण काय?









