BSNL ने केलंय 365 दिवस सिम अॅक्टिव्ह ठेवण्याचं जुगाड! स्वस्त प्लॅनने यूझर्स खुश
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
BSNLने त्यांच्या कोट्यावधी मोबाईल यूजर्सना आनंद दिला आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीच्या स्वस्त 365 दिवसांच्या प्लॅनमध्ये, यूजर्सना दीर्घ व्हॅलिडिटीसह कॉलिंग आणि डेटाचा फायदा देखील मिळतो.
BSNLकडे 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनेक स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत. ज्यामध्ये यूझर्सना दीर्घ व्हॅलिडिटीसह अनिलिमिटेड कॉलिंग आणि डेटासारखे फायदे मिळतात. सरकारी टेलिकॉम कंपनीने अलीकडेच असाच एक स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला डेली फक्त 3 रुपये खर्च करून पूर्ण 12 महिन्यांची व्हॅलिडिटी मिळेल.
advertisement
गेल्या काही काळापासून, सरकारी टेलिकॉम कंपनी त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांसाठी समस्या निर्माण करत आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये, खाजगी कंपन्यांच्या योजनांच्या किमती जास्त असल्याने लाखो यूझर्स बीएसएनएलकडे वळले होते. चला, बीएसएनएलच्या या 365 दिवसांच्या स्वस्त प्लॅनबद्दल जाणून घेऊया...
advertisement
BSNLचा 365 दिवसांचा प्लॅन : बीएसएनएलने हा स्वस्त रिचार्ज प्लॅन 1198 रुपयांमध्ये सादर केला आहे. याच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये यूझर्सना 365 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याशिवाय, यूझर्सना दरमहा 300 मिनिटांच्या कॉलिंगचा फायदा मिळतो. यूझर्स भारतात कुठेही कॉल करण्यासाठी या कॉलिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय, यूजर्सना फ्री राष्ट्रीय रोमिंगचा लाभ देखील मिळेल, ज्यामध्ये त्यांना भारतात कुठेही इनकमिंग तसेच आउटगोइंग कॉलचा लाभ मिळेल.
advertisement
भारत संचार निगम लिमिटेड या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये त्यांच्या यूजर्सना दरमहा 3GB डेटा देखील देते. एवढेच नाही तर या प्लॅनमध्ये यूजर्सना दरमहा 30 फ्री एसएमएसचा लाभ देखील मिळेल. या प्लॅन व्यतिरिक्त, कंपनीकडे 1,499 आणि 2,399 रुपयांचे प्लॅन आहेत, ज्यामध्ये यूझर्सना 1 वर्ष किंवा त्याहून अधिक व्हॅलिडिटी मिळते.
advertisement
BSNLची 5G सर्व्हिस : बीएसएनएलशी संबंधित इतर बातम्यांबद्दल बोलायचे झाले तर, भारत संचार निगम लिमिटेड लवकरच भारतात त्यांची 5G सेवा सुरू करू शकते. कंपनीचे सीएमडी रॉबर्ट जे रवी यांनी पुष्टी केली आहे की बीएसएनएलची 5G सेवा जूनमध्ये दिल्लीसह अनेक शहरांमध्ये सुरू केली जाऊ शकते. कंपनी सध्या 1 लाख नवीन 4G मोबाईल टॉवर बसवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी, कंपनीने 75 हजारांहून अधिक नवीन मोबाइल टॉवर्स सुरू केले आहेत.