नंबर शेअर न करताना WhatsApp वर करु शकता चॅट! आता येणार यूझरनेम

Last Updated:
यूझर्स त्यांचा नंबर शेअर न करता व्हॉट्सअॅपवर चॅट करू शकतील. व्हॉट्सअॅपवर इंस्टाग्रामसारखे युजरनेम तयार करता येईल. हे टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या हँडलसारखेच असेल.
1/5
WhatsApp New Feature: 2009 मध्ये स्टेटस अपडेट अॅप म्हणून लाँच झालेल्या व्हॉट्सअॅपचे जगभरात 2 अब्जाहून अधिक यूझर्स आहेत. व्हॉट्सअॅप एक सुप्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाते. कंपनी व्हॉट्सअॅपवर अनेक फीचर्स आणत राहते. आता यूझर्ससाठी एक नवीन अपडेट आले आहे.

advertisement
2/5
WhatsAppवर डिसपायरिंग मेसेजेस, चॅट लॉक आणि इतर अनेक फीचर्स आहेत. आता कंपनी 'व्हॉट्सअॅप युजरनेम' या नवीन फीचरची चाचणी घेत आहे. या फीचरद्वारे तुम्ही तुमचा फोन नंबर शेअर न करता इतर यूझर्सशी चॅट करू शकता. यूझर्स बऱ्याच काळापासून या फीचरची मागणी करत होते.

3/5
WABetaInfo नुसार, हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अलीकडील बीटा व्हर्जन (2.24.18.2) मध्ये दिसून आले आहे. सध्या हे फीचर यूझर्ससाठी रोलआउट केलेले नाही. लवकरच सर्व यूझर्ससाठी हे फीचर आणले जाईल अशी अपेक्षा आहे. हे फीचर सुरू झाल्यानंतर, तुम्ही तुमचा फोन नंबर न सांगता लवकरच चॅटिंग सुरू करू शकता.

4/5
आता WhatsAppवर युजरनेम फीचर सुरू होईल : लवकरच, व्हॉट्सअॅप युजरनेम सादर करेल. ज्यामुळे तुम्हाला तुमचे स्वतःचे हँडल तयार करता येईल. जे टेलिग्राम किंवा इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या हँडलसारखे असेल. या फीचरनंतर, फोन नंबरची आवश्यकता राहणार नाही. परंतु इतर लोक या नवीन युजरनेमचा वापर करून तुम्हाला शोधू आणि मेसेज करू शकतील. हे विशेषतः ग्रुप चॅटमध्ये किंवा तुम्हाला चांगले माहित नसलेल्या लोकांशी कनेक्ट होण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

5/5
असे सांगितले जात आहे की, व्हॉट्सअॅप गोष्टी सुरक्षित ठेवण्यासाठी आणि यूझर्सना चांगला अनुभव देण्यासाठी युजरनेमसाठी काही नियम सेट करू शकते. यामध्ये www ने सुरू न होणारे युजरनेम, फक्त लोअरकेस अक्षरे इत्यादींचा समावेश असू शकतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement