advertisement

किचनमध्ये फ्रीज आणि बाथरुममध्ये वॉशिंगमशीन ठेवता? आताच बंद करा ही सवय

Last Updated:
बहुतांशी घरांमध्ये फ्रीज किचनमध्ये आणि वॉशिंग मशीन बाथरूममध्ये ठेवलं जातं. पण, यामुळे या दोन्ही उपकरणांचं नुकसान होऊ शकतं, याची तुम्हाला कल्पना आहे का?
1/7
रेफ्रिजरेटर (फ्रीज) आणि वॉशिंग मशीन ही आपल्या दैनंदिन वापरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणं आहे. जवळपास बहुतांशी घरांमध्ये भाजीपाला, डेअरी प्रॉड्क्ट्स आणि शिजवलेलं अन्न थंड ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला जातो. तर, खराब झालेले कपडे स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग मशीनचा उपयोग होतो. या उपकरणांची योग्य प्रकारे देखभाल करणे अतिशय महत्त्वाचं आहे.

2/7
किचनमध्ये फ्रीज ठेवल्याने लवकर खराब होण्याची शक्यता असते. कधीकधी त्यामुळे अपघातही होऊ शकतो. फ्रीज सुरू असताना आतून गरम हवा बाहेर येते. अशा परिस्थितीत तो किचनमध्ये राहिल्यास धोका निर्माण होऊ शकतो. सामान्यपणे स्वयंपाकघर घरातील इतर खोल्यांपेक्षा लहान असते. गॅस स्टोव्हमुळे तिथेच आधीच जास्त उष्ण वातावरण असते.

3/7
अशा परिस्थितीत फ्रीजच्या उष्णतेमुळे येथील तापमान आणखी वाढतं. त्याचबरोबर किचनमधून बाहेर पडणाऱ्या तेलाच्या चिकटपणामुळे फ्रीजचं आयुष्यही कमी होते.

4/7
तज्ज्ञांच्या मते, थोड्याशा मोकळ्या आणि व्हेंटिलेशनची चांगली व्यवस्था असलेल्या ठिकाणी फ्रीज ठेवलं पाहिजे. शक्य असल्यास तुम्ही बाल्कनीमध्येही फ्रीज ठेवू शकता.

5/7
फ्रीजप्रमाणे वॉशिंग मशीन देखील चुकीच्या जागी ठेवलं जातं. बहुतांशी लोक बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवतात. जर तुम्ही वॉशिंग मशिन बाथरूममध्ये ठेवलं तर ते नेहमी ओलं राहतं.

6/7
जरी त्यावर पाणी पडलं नाही तरी बाथरूममधील आर्द्रतेमुळे मशीनची बॉडी आणि अंतर्गत भाग लवकर खराब होऊ शकतात. यामुळे वॉशिंग मशीन नेहमी बाथरूमच्या बाहेर ठेवावं. जेणेकरून ते दीर्घकाळ टिकेल.

7/7
फ्रीज आणि वॉशिंग मशीनची कार्यक्षमता व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना योग्य ठिकाणी ठेवणे फार गरजेचं आहे. ही दोन्ही उपकरणं घरकामात अत्यंत मोलाचं योगदान देतात त्यामुळे त्यांची काळजी घेेणंही महत्त्वाचं आहे.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement