केबल आणि टॉवरशिवाय चालते सॅटेलाईट इंटरनेट, ब्रॉडबँडपेक्षा स्वस्त असेल?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
How Satellite Internet Works: टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहेत. भारतात सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर ते सुरू करता येईल.सॅटेलाइट इंटरनेट हे आज सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ब्रॉडबँड इंटरनेटपेक्षा बरेच वेगळे असणार आहे. सॅटलाइट इंटरनेट म्हणजे काय आणि ते कसे काम करते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
स्टारलिंकची इंटरनेट सेवा सॅटेलाइट आधारित आहे. जी ब्रॉडबँड टॉवर किंवा मोबाइल नेटवर्क वापरत नाही. सॅटेलाइट इंटरनेट ही एक सेवा आहे ज्यामध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी उपग्रह वापरला जातो. हे ज्या भागात पारंपारिक ब्रॉडबँड किंवा मोबाइल नेटवर्क उपलब्ध नाहीत, जसे की दुर्गम गावे, डोंगराळ भाग किंवा सागरी भागांमध्ये इंटरनेट सेवा प्रदान करण्यात मदत करते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
माहितीनुसार, अमेरिकेत स्टारलिंगची किंमत प्रति महिना $110 आहे, तर हार्डवेअरसाठी एकदा $599 मोजावे लागतात. जर आपण भारताबद्दल बोललो तर त्याची किंमत अंदाजे 7000-8000 रुपये आहे. तसेच, इन्स्टॉलेशन चार्जेस वेगळे भरावे लागतील. स्टारलिंक व्यावसायिक आणि वैयक्तिक वापरासाठी विविध योजना ऑफर करते, ज्या यूझर्सना आकर्षित करू शकतात.