हिवाळ्यातही तुमचा स्मार्टफोन गरम होतोय? याची कारणं पाहून बसेल धक्का
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Smartphone Heating: लोक सहसा असे मानतात की, फोन फक्त उन्हाळ्यातच जास्त गरम होतात, परंतु बरेच यूझर हिवाळ्यातही स्मार्टफोन जास्त गरम होण्याची तक्रार करतात.
Smartphone Heating: आजच्या काळात प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोन वापरताना अनेकांना काही समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा स्मार्टफोन हा वापरताना गरम होतो. पणरंतु अनेकांना वाटतं तो फक्त उन्हाळ्यातच गरम होतो. परंतु बरेच यूझर हिवाळ्यातही स्मार्टफोन जास्त गरम होण्याची तक्रार करतात. थंड हवामानात हात थंड असतात, परंतु फोन जास्त गरम होणे हे अनेकदा आश्चर्यकारक असते. प्रत्यक्षात, यासाठी केवळ हवामान जबाबदार नाही तर आपल्या काही सवयी आणि फोनची टेक्नॉलॉजी जबाबदार आहे.
advertisement
हिवाळ्यात फोन जास्त गरम का होतो? : थंड हवामानात, फोनचे तापमान बाहेरून थंड राहते, परंतु प्रोसेसर, बॅटरी आणि इतर हार्डवेअर सतत काम करत असतात. जेव्हा जड अॅप्स, गेम किंवा बॅकग्राउंड प्रोसेस जास्त चालतात तेव्हा आतील उष्णता बाहेर पडू शकत नाही. थंड हवा असूनही, आत साठवलेली उष्णता फोन गरम करण्यास भाग पाडते.
advertisement
बॅटरी आणि चार्जिंग:हिवाळ्यात लिथियम-आयन बॅटरीची कार्यक्षमता नैसर्गिकरित्या कमकुवत होते. तुम्ही तुमचा फोन चार्ज करता तेव्हा बॅटरी जास्त काम करते, उष्णता निर्माण करते. बरेच लोक थंडीत चार्जिंगला फोन ब्लँकेट किंवा उशाखाली ठेवून फोन चार्जिंगला ठेवतात, ज्यामुळे व्हेंटिलेशन बंद होते आणि फोन लवकर गरम होतो.
advertisement
हेवी अॅप्स आणि गेमिंगचा परिणाम : तुम्ही PUBG, BGMI, कॉल ऑफ ड्यूटी सारखे हाय-ग्राफिक्स गेम खेळत असाल किंवा थंडीत जास्त वेळ व्हिडिओ एडिटिंग आणि रील क्रिएशन करत असाल तर प्रोसेसरचा भार वाढतो. हिवाळ्यातही हा भार कमी होत नाही; खरं तर, फोन सामान्य तापमान राखण्यासाठी अनेकदा जास्त पॉवर वापरतो, ज्यामुळे उष्णता वाढते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









