Jio Free देतंय Gemini 3 AI चा अॅक्सेस! 18 महिने बिनधास्त वापरा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Jio Offer: टेलिकॉम कंपनीने जिओ 5जी यूझर्ससाठी एक शानदार ऑफर लाँच केली आहे. या ऑफर अंतर्गत, कंपनी १८ महिन्यांसाठी गुगल जेमिनी प्रो फ्री अॅक्सेस देईल. चला जाणून घेऊया ही ऑफर कशी क्लेम करायची.
लाखो Reliance Jio यूझर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनीने एक शानदार ऑफर लाँच केली आहे. जिओच्या लेटेस्ट ऑफर अंतर्गत, Unlimited 5G प्लॅन वापरणाऱ्या 18 वर्षांवरील सर्व यूझर्सना जेमिनी प्रो फ्री अॅक्सेस दिला जाईल. याचा अर्थ ते गुगलच्या प्रगत एआय मॉडेल, जेमिनी 3 चा लाभ देखील घेऊ शकतील. ही ऑफर सुरुवातीला फक्त तरुण ग्राहकांसाठी उपलब्ध होती, परंतु आता सर्व अनलिमिटेड 5जी यूझर्सना त्याचा फायदा होईल.
advertisement
या ऑफरद्वारे, लाखो जिओ यूझर्स प्रगत एआय तंत्रज्ञान मोफत अॅक्सेस करू शकतील. ज्यामुळे त्यांना अनेक कामे सहजतेने करता येतील. Jio Gemini Pro Offerचे फायदे एक, दोन किंवा सहा महिन्यांसाठी नाही तर 18 महिने किंवा दीड वर्षांसाठी उपलब्ध असतील. गुगल जेमिनी प्रो प्लॅनची किंमत ₹35100 आहे. म्हणजेच तुम्हाला ₹35 हजार किमतीचा एआय प्लॅन पूर्णपणे फ्री मिळेल.
advertisement
advertisement
advertisement


