Motorolaने लॉन्च केला सर्वात स्वस्त फोल्डेबल फोन! मिळेल जबरदस्त कॅमेरा, किंमत किती?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Motorola Razr 50 भारतात लॉन्च झालाय. यामध्ये 3.6 इंचांचा छोटा डिस्प्ले आहे. 50MPचा कॅमेरा आहे आणि Gorilla Glass Victus ची सुरक्षा आहे. जाणून घेऊया Motorola Razr 50 ची किंमत, फीचर्स आणि स्पेक्स...
Motorola ने आपला नवीन फोल्डेबल फोन Razr 50 भारतात लॉन्च केलाय. हा फोन Razr सीरीजचा दुसरा फोन आहे आणि तो पहिल्या फोनपेक्षा स्वस्त आहे. यात एक लहान 3.6-इंचाचा डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि Gorilla Glass Victusची सुरक्षा आहे. फोनच्या मागील बाजूस वीगन लेदर कव्हर आहे. चला जाणून घेऊया Motorola Razr 50 ची किंमत, फीचर्स आणि स्पेस...
advertisement
Motorola Razr 50 ची किंमत 64,999 रुपये आहे. या फोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. Motorola काही दिवसांसाठी या फोनवर 5,000 रुपयांची सूट देतेय. तुम्ही काही बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांची सूटही मिळेल. हा फोन तुम्ही 20 सप्टेंबरपासून Amazon, Motorola वेबसाइट किंवा कोणत्याही स्टोअरवरून खरेदी करू शकता. या फोनमध्ये तीन रंग आहेत: कोआला ग्रे, बीच सँड आणि स्पिरिट्स ऑरेंज.
advertisement
डिस्प्ले: या डिव्हाइसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, HDR10+ टेक्नॉलॉजी आणि 3,000 nits ब्राइटनेससह डिव्हाइस मध्ये 6.9-इंचाचा पोलेड FHD+ AMOLED मुख्य डिस्प्ले आहे. याशिवाय, यात 3.63-इंचाचा OLED FHD+ AMOLED कव्हर डिस्प्ले देखील आहे जो 90Hz रिफ्रेश रेट, HDR10 टेक्नॉलॉजी, 1,700 nits ची कमाल ब्राइटनेस आणि गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षणास समर्थन देतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement