आता हे शक्य आहे, फोन नंबरशिवाय WhatsApp वापरता येणार! कंपनीने आणलं नवं फीचर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
व्हॉट्सॲप लवकरच यूजरनेमद्वारे लॉगिन फीचर आणणार आहे, ज्यामुळे मोबाइल नंबरची गरज नाही. हे फीचर सध्या अँड्रॉइड बीटा आवृत्तीत रिझर्व्हेशन टप्प्यावर आहे.
advertisement
सध्या व्हॉट्सॲप अकाऊंट तयार करण्यासाठी मोबाइल नंबर अनिवार्य असतो, पण मेटा कंपनी आता हे लॉगिन प्रणाली बदलू इच्छित आहे. सन २००९ मध्ये व्हॉट्सॲप लाँच झाल्यापासून, प्रत्येक युजरला त्यांच्या मोबाइल नंबरच्या मदतीनेच लॉगइन करावे लागते. आता ही लॉगइन प्रक्रिया बदलून टेलिग्रामप्रमाणेच, व्हॉट्सॲपवर देखील कंपनी यूजरनेमद्वारे लॉगिन करण्याची पद्धत जोडण्याची योजना आखत आहे.
advertisement
या फीचरमुळे युजर्सना त्यांची Privacy अधिक चांगल्या प्रकारे जपण्यास मदत मिळेल. हे फीचर अलीकडेच WABetaInfo ने व्हॉट्सॲपच्या अँड्रॉइड बीटा आवृत्तीमध्ये तपासणीदरम्यान पाहिले आहे. विशेष म्हणजे, व्हॉट्सॲपवर यूजरनेम फीचर दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही ते बीटा व्हर्जनमध्ये दिसून आले होते. या नव्या फीचरमध्ये यूजरनेम तयार करण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
advertisement
उदाहरणार्थ, यूजरनेमची सुरुवात 'WWW.' ने नसावी, जेणेकरून वेबसाइट्ससोबत कोणताही गोंधळ होणार नाही. तसेच, प्रत्येक यूजरनेममध्ये किमान एक अक्षर असणे आवश्यक आहे. युजर्स a ते z पर्यंतच्या लहान अक्षरांमध्ये (Lowercase letters) यूजरनेम तयार करू शकतील. अक्षरांव्यतिरिक्त, युजर्स नंबर आणि काही विशेष चिन्हांचाही वापर करू शकतील.
advertisement
advertisement
सध्याच्या बीटा आवृत्तीत युजर्सला या फीचरच्या मदतीने सर्व सेवा वापरण्याचा अॅक्सेस मिळालेला नाही. रिझर्व्हेशनचा वापर करून युजर्स केवळ त्यांचे यूजरनेम 'लॉक' करू शकतात, मात्र या फीचरच्या मदतीने अद्याप मेसेजिंग करता येणार नाही. कंपनी कोणतेही फीचर युजर्ससाठी पूर्णपणे उपलब्ध करण्यापूर्वी ते बीटा आवृत्तीत तपासते.
advertisement