जिगरी मित्राने केले वाटोळे, एका दिवासत मस्क यांना 15200 कोटींचा फटका, ट्रम्प यांनी डाव फिरवला
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संघर्षामुळे टेस्लाचे शेअर्स 14% कोसळले, ज्यामुळे कंपनीला 152 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. मस्कने ट्रम्पच्या आर्थिक विधेयकावर सडकून टीका केली होती.
जिगरी दोस्ताला जीवापाड मदत करणाऱ्या मित्राचेच 15200 कोटी पाण्यात बुडाल्याची घटना जगानं पाहिली. मित्रासाठी पाण्यासारखा पैसे ओतलेल्या मित्राचंच नुकसान केलं अशी टिका आता सोशल मीडियावर सुरू झाली आहे. जिगरी दोस्त समजले जाणारे टेस्लाचे सीईओ एलन मस्क आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एवढ्यावरच न थांबता ट्रम्प यांनी मस्क यांना सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडी आणि कॉन्ट्रॅक्ट्स बंद करण्याची धमकी दिली. या दोघांमधील संघर्षाचा परिणाम थेट एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीवर झाला. गुरुवारी टेस्लाचे शेअर्स तब्बल 14 टक्क्यांनी कोसळले, ज्यामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात 152 अब्ज डॉलर्सचा तोटा झाला
advertisement
advertisement