बार्सिलोनामध्ये बाप्पाचा थाट! मराठमोठ्या बांधवांनी असा साजरा केला सण, पाहा PHOTO

Last Updated:
दीड दिवसाच्या गणपतीला निरोप देताना उपस्थित सर्वच बार्सिलोनावासी मराठी बांधवांचं अंतकरण भरुन आलं होतं. पाणावलेल्या डोळ्यांनी अखेर बाप्पाला निरोप दिला.
1/7
भारतातच नाही तर भारताबाहेरही बाप्पाची धूम पाहायला मिळाली. परदेशातही अनेक ठिकाणी बाप्पाचं जंगी स्वागत करण्यात आलं. बार्सिलोना इथे मराठी बांधवांनी बाप्पाला थाटामाटात आणलं आणि त्याचं स्वागत केलं. या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं.

advertisement
2/7
बार्सिलोना इथल्या मराठी बांधवांनी खास न्यूज 18 मराठीसोबत फोटो शेअर केले आहेत. भारताच्या चांद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेची पार्श्वभूमी असलेल्या देखाव्यात श्रीगणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करणेत आली होती.

3/7
भारताचे स्पेन मधील राजदूत श्री दिनेश पटनाईक आणि त्यांच्या सुविज्ञ पत्नी सौ.पुनम पटनाईक आवर्जून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली.

4/7
बार्सिलोना आणि परिसरातील दिड-दोनशे मराठी बांधवांनी एकत्र येऊन हा सण साजरा केला. यानिमित्ताने मोठा उत्साह, आनंद पुन्हा सगळ्यांना अनुभवता आला.

5/7
दीड दिवसाच्या गणपतीला निरोप देताना उपस्थित सर्वच बार्सिलोनावासी मराठी बांधवांचं अंतकरण भरुन आलं होतं. पाणावलेल्या डोळ्यांनी अखेर बाप्पाला निरोप दिला.
दीड दिवसाच्या गणपतीला निरोप देताना उपस्थित सर्वच बार्सिलोनावासी मराठी बांधवांचं अंतकरण भरुन आलं होतं. पाणावलेल्या डोळ्यांनी अखेर बाप्पाला निरोप दिला.
advertisement
6/7
देवेंद्र रिदूरकर, गौतम रॉय, तुषार फेणीकर, सुमीत कुटवाल , नितीन जोशी, शंभूराज, सौ. वैशाली मावळणकर, सौ. सोनाली लाचुरे, स्वरुप वैद्य , ऋतुजा कुटवाल,  प्रांजली वनीकर, ऋतुजा दिघे, मेघा शंभूराज यासोबत अनेक जण उपस्थित होते.

7/7
बार्सिलोना इथे खास मराठी सण, परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्र मंडळ स्थापन करण्यात आलं आहे. या ठिकाणी सगळे एकत्र येऊन सण साजरे करतात.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement