दहावीच्या विद्यार्थिनीची मार्कशीट Viral! जिनं घवघवीत यश मिळवलं, तिच पाहायला नाही या जगात
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
दहावीचा निकाल हा आपल्या करियरचा पहिला टप्पा असतो, म्हणून विद्यार्थी किमान या वर्षात अगदी जीव ओतून अभ्यास करतात. अनेकजणांची पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी धडपड असते. या विद्यार्थिनीचीही हीच इच्छा होती. म्हणून तिनं स्वत:ला अभ्यासात अक्षरश: झोकून दिलं होतं. तिनं तब्बल 99.7 टक्के गुण मिळवले. (मुस्तुफा लकडावाला, प्रतिनिधी / राजकोट)
advertisement
advertisement
advertisement
16 वर्षीय हीरवर 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. ब्रेन स्ट्रोकमुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिची ब्रेन सर्जरी झाली. जरा बरं वाटल्यानंतर घरी पाठवण्यात आलं, परंतु तिला अचानक श्वास घ्यायला त्रास झाल्याने थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. ब्रेन एमआरआयचे रिपोर्ट आल्यानंतर कळलं की, तिच्या मेंदूचा 80 ते 90 टक्के भाग निष्क्रिय झाला होता. अखेर 15 दिवसांच्या उपचारांनंतर हीरची मृत्यूशी झुंज संपली. तिनं श्वास सोडला.
advertisement
गुजरातची रहिवासी असलेल्या हीरचे <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/how-to-avoid-spectacles-eye-care-tips-in-marathi-watch-video-mpkp-1182937.html?utm_source=District%20Widget&utm_medium=Desktop&utm_campaign=marathi">डोळे</a> राजकोटमधील 2 व्यक्तींना दान करण्यात आले आहेत, तर तिचं शरीर वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी दान करण्यात आलंय. त्यामुळे हीरला डॉक्टर होता आलं नसलं तरी तिनं 2 व्यक्तींना नवजीवन देण्याचं कार्य चोख पार पाडलंय. शिवाय तिच्या शरिराचा <a href="https://news18marathi.com/india-result/">अभ्यास</a> करून आता भविष्यात कित्येक <a href="https://news18marathi.com/national/cbse-10th-result-cbseresults-nic-in-check-here-online-and-sms-mhkk-1180943.html">विद्यार्थी</a> डॉक्टरकीची पदवी मिळवतील.


