मिस इंडिया व्हायचं होतं, तिनं UPSC दिली, 3 वेळा नापास झाली! चौथ्यांदा मात्र...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी एकतर अभ्यासाला कंटाळून ध्येयाचा विचार सोडून देतात किंवा इतर सर्व गोष्ट सोडून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करतात. एका मॉडेलनेही आपली आवड सोडून यूपीएससीचा अभ्यास करायला सुरूवात केली. तिने चारवेळा त्याच उत्साहाने परीक्षा दिली आणि 2022 साली 736वा क्रमांक मिळवला. (हिना आजमी, प्रतिनिधी / देहरादून)
उत्तराखंडची राजधानी असलेल्या देहरादूनची रहिवासी तस्कीन खान हिचं मॉडेलिंग करियर उत्तम सुरू होतं. परंतु तिने हे क्षेत्र सोडून अचानक यूपीएससीचा अभ्यास करायला सुरूवात केली. तीनवेळा तिच्या हाती अपयश आलं, मात्र तिने हार मानली नाही. 2022 साली चौथ्यांदा परीक्षा दिली आणि त्यात तिला उत्तम गुण मिळाले. तिने 736वा क्रमांक पटकावला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


