माणसाचा होईल शेवट मग पृथ्वीवर असे प्राणी करतील राज्य, धक्कादायक रिसर्च समोर
- Published by:sachin Salve
Last Updated:
पृथ्वीवरून मानवी जीवन नष्ट होणार असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. संशोधक यावर संशोधन देखील करत आहेत. याबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पृथ्वीवरून मानवी जीवन नष्ट होणार असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकायला मिळतात. संशोधक यावर संशोधन देखील करत आहेत. याबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात मानवाचं अस्तित्व नष्ट झाल्यावर पृथ्वीवर कोणता सजीव राज्य करू शकतो, या बाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार मानवाच्या पश्चात पृथ्वीवर ऑक्टोपस या प्राण्याचा दबादबा असेल, असं मत संशोधक व्यक्त करत आहेत.
advertisement
डायनासोर प्रमाणेच एक दिवस मानवदेखील पृथ्वीवरून नाहीसा होईल. मग त्यानंतर पृथ्वीवर कोणाचा दबदबा असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. संशोधकांनी याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. मानवापश्चात पृथ्वीवर ऑक्टोपसचा दबदबा असेल. एका संशोधकाच्या मते, जेव्हा पृथ्वीवर मानवाचं अस्तित्व संपलेलं असेल तेव्हा 8 पायांचा ऑक्टोपस हा जीव पृथ्वीचा ताबा घेईल.
advertisement
advertisement
कूलसन यांनी `द युरोपियन मॅगेझिन`शी बोलताना सांगितलं की, ``ऑक्टोपस हे खूप बुद्धिमान असतात. त्यांच्यात एकमेकांशी संवाद साधण्याचे कौशल्य, जिज्ञासा आणि क्षमता असते. त्यामुळे पृथ्वीवरून मानवाचे अस्तित्व संपुष्टात आल्यावर ते असं करू शकतात. काही विशेष क्षमता त्यांना जगावर ताबा मिळवण्यासाठी `ध्रुवीय स्थिती`त ठेवते.``
advertisement
``ऑक्टोपस खूप हुशार असतात. ते सहजपणे गोष्टींशी जुळवून घेतात. हा पृथ्वीच्या दृष्टीने एक समृद्ध जीव आहे. तो कोणतीही समस्या सहजपणे सोडवू शकतो. तो कोणत्याही गोष्टी सहजपणे हाताळू शकतो. तसेच तो स्वतः आश्चर्यकारकरित्या लपून राहू शकतो. याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील मानवाचं अस्तित्व नष्ट झालं आणि ऑक्टोपसला अनुकूल वातावरण मिळालं तर तो स्वतः एक संस्कृती विकसित करू शकतो,`` असं कूलसन यांनी सांगितलं.
advertisement
advertisement
कूलसन यांच्या दाव्यानुसार, ``ऑक्टोपस स्वतःचे रुपांतर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यात करू शकतो. त्यांनी काही काळ पाण्याबाहेरही घालवला आहे. त्यामुळे ही गोष्ट त्यांना शिकार करण्याच्या नवीन पद्धती विकसित करण्यात मदत करू शकते. मानवाने जशी समुद्रात शिकार करण्याची पद्धत विकसित केली, त्याचप्रमाणे ऑक्टोपस अजूनही जमिनीवर शिकार करण्याची पद्धत विकसित करू शकतात. जलचर प्राणी 30 मिनिटे पाण्याबाहेर राहू शकतात. पण त्यांना जमिनीवर शिकार करण्याचे कौशल्य पूर्णपणे आत्मसात करण्यास लाखो वर्षे लागतील.``