Flight Tickets: हे कुणालाच माहिती नाही, या दिवशी संध्याकाळी बुकिंग केल्यावर मिळतात विमानाची स्वस्त तिकिटं!
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
फिरायला जायचं असेल किंवा लग्नसराईच्या हंगामात कुणाच्या लग्नाला जायचं असेल तर बस, ट्रेन व विमान असे ऑप्शन्स आहेत. लांबचा प्रवास असेल तर वेळ वाचवण्यासाठी विमानाने जाणं अनेक जण पसंत करतात.
advertisement
विमान प्रवास कम्फर्टेबल असतोच सोबतच वेळही वाचतो; मात्र प्रत्येकाचं तेवढं बजेट नसतं. खूपदा तिकिटं इतकी महाग असतात की जाणं कॅन्सल करावं लागतं. काही इमर्जन्सी असेल आणि जाणं भाग असेल तर मात्र खर्च करण्यावाचून पर्याय नसतो. तुम्हीही जर विमान प्रवास करण्याच्या विचारात असाल तर कमी खर्चात तिकीट बुक करण्याबद्दल काही बाबी जाणून घेऊ या.
advertisement
सहसा आठवड्याच्या शेवटी तिकिटांचे दर खूप जास्त असतात. तुम्ही पुढच्या आठवड्याचा प्लॅन करत असाल तर त्या आठवड्याच्या मंगळवारी संध्याकाळी फ्लाइट तिकीट बुक करा. समजा तुम्हाला शनिवारी किंवा रविवारच्या फ्लाइटचं बुकिंग करायचं असेल, तर तुम्हाला मंगळवारी संध्याकाळी पाचनंतर तिकीट बुक करावं लागेल. या दिवशी तुम्हाला अतिशय कमी किमतीत तिकिटं मिळतील. गुगलच्या माहितीनुसार, सोमवार ते बुधवारदरम्यानच्या फ्लाइट वीकेंडच्या फ्लाइटच्या तुलनेत 12 ते 20 टक्के स्वस्त आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


