नशेत गिळला लायटर, 30 वर्षे पोटातच; डॉक्टरांनी कंडोम वापरून काढला, कसा काय?

Last Updated:
दारूच्या नशेत लोक काय करतील याचा नेम नाही... आता हेच पाहा, एक प्रकरण ज्यात एका व्यक्तीने दारूच्या नशेत चक्क सिगारेट पेटवण्याचा लायटर गिळला. धक्कादायक म्हणजे तब्बल 30 वर्षे हा लायटर त्याच्या पोटातच होता. त्यातून आश्चर्यकारक म्हणजे डॉक्टरांनी हा लायटर कंडोम वापरून पोटातून बाहेर काढला आहे. चीनमधील हे अजब प्रकरण.
1/7
एका व्यक्तीने 30 वर्षांपूर्वी दारूच्या नशेत सिगारेटचा लायटर गिळला होता, तो 30 वर्षे तसाच पोटात होता. अलीकडेच त्याचं पोट दुखू लागलं तेव्हा तो रुग्णालयात गेला तेव्हा ही बाब उघडकीस आली. लायटर काढण्यासाठी डॉक्टरांना एक अनोखी आणि कल्पक पद्धत वापरावी लागली. त्यांनी कंडोम वापरून त्या माणसाच्या पोटातून लायटर काढला.

advertisement
2/7
चेंगडूमधील हे प्रकरण ज्याने वैद्यकीय शास्त्रालाही गोंधळात टाकलं आहे. डेंग नावाची ही व्यक्ती. जिचं पोट सतत दुखत होतं, फुगत होते. पोटदुखी आणि पोटफुगीची तक्रार घेऊन तो रुग्णालयात दाखल झाला. गेल्या महिनाभरापासून त्याला वेदना होत होत्या. डॉक्टरांनी गॅस्ट्रोस्कोपी केली तेव्हा रुग्णाच्या पोटात खोलवर एक काळी, आयताकृती वस्तू आढळून आली. जेव्हा त्यांनी डेंगला त्या वस्तूबद्दल सांगितलं तेव्हा त्याला दशकांपूर्वीची एक घटना आठवली.

3/7
1991-92 च्या सुमारास तो एका मित्रासोबत दारू पित होता. त्याने त्याला तो लायटर गिळून शकत नाही असं सांगितलं. डेंगने ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्याने लाइटर गिळलं. तो म्हणाला, मला वाटलं की ते नैसर्गिकरित्या बाहेर येईल, पण ते तिथंच राहिल अशी मला अपेक्षा नव्हती,
1991-92 च्या सुमारास तो एका मित्रासोबत दारू पित होता. त्याने त्याला तो लायटर गिळून शकत नाही असं सांगितलं. डेंगने ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्याने लाइटर गिळलं. तो म्हणाला, मला वाटलं की ते नैसर्गिकरित्या बाहेर येईल, पण ते तिथंच राहिल अशी मला अपेक्षा नव्हती,"
advertisement
4/7
30 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही डेंगला कोणताही त्रास झाला नाही. त्याला कधीकधी पोटात हलकं दुखणं जाणवत होतं, पण सामान्य औषधांनी त्याला आराम मिळत असे. लायटर 30 वर्षे त्याच्या पोटात कोणत्याही मोठ्या गुंतागुंतीशिवाय राहिला, हे वैद्यकीय समुदायालाही आश्चर्यचकित करणारं होतं. डेंगच्या पत्नी आणि मुलाला हे कळल्यावर खूप धक्का बसला. (प्रतीकात्मक फोटो)

5/7
एका महिन्यापूर्वी, जेव्हा वेदना आणि सूज कायम राहिली तेव्हा त्यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला डॉक्टरांनी पोटातील लायटर काढण्यासाठी चिमट्यासारखी पारंपारिक पद्धती वापरली पण ते काम करत नव्हतं. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं की,
एका महिन्यापूर्वी, जेव्हा वेदना आणि सूज कायम राहिली तेव्हा त्यांनी रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला डॉक्टरांनी पोटातील लायटर काढण्यासाठी चिमट्यासारखी पारंपारिक पद्धती वापरली पण ते काम करत नव्हतं. रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितलं की, "लायटरचा पृष्ठभाग खूप गुळगुळीत होता. जेव्हा जेव्हा आम्ही तो पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो निसटून जायचा. आम्हाला बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग सापडत नव्हता, म्हणून आम्हाला ही पद्धत सोडून द्यावी लागली."
advertisement
6/7
लायटर पकडणं अशक्य होत चाललं होतं आणि ते पोटात सोडणं प्राणघातक ठरू शकते. म्हणून डॉक्टरांनी कंडोम वापरण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी सांगितलं की कंडोम लायटर सुरक्षितपणे अडकवण्यासाठी आणि काढण्यासाठी आदर्श आहे. चिमट्याचा वापर करून डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटात हळूहळू कंडोम घातला. त्यानंतर त्यांनी काळजीपूर्वक कंडोमच्या आत लायटर घेतला आणि रुग्णाच्या तोंडातून हळूवारपणे बाहेर काढला. संपूर्ण प्रक्रियेला फक्त 20 मिनिटं लागली.

7/7
अंदाजे 7 सेंटीमीटर लांब लायटर, यात ज्वलनशील वायू आहे आणि जर तो पोटातील आम्लाशी प्रतिक्रिया देत असेल तर ते जीवघेणं ठरू शकतं. डॉक्टरांनी रुग्णाला त्याच्या निष्काळजीपणाबद्दल इशारा दिला आणि म्हटलं की हा एक गंभीर धोका आहे ज्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.

Madhuri Dixit On Politics : पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' गर्लने मौन सोडलं
पुण्यातून निवडणुकीची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? अखेर मौन सोड
  • पुण्यातून निवडणूक लढवण्याची होती चर्चा, खरंच राजकारणात येणार का माधुरी? 'धकधक' ग

View All
advertisement