हेडफोन, ब्लँकेट आणि बरंच काही... विमानातील या वस्तू तुम्ही फ्रीमध्ये घरी नेऊ शकता

Last Updated:
Airplane Facts : विमानाने प्रवास करताना काही वस्तू घेऊन जाण्यावर निर्बंध आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की अशा अनेक वस्तू आहेत ज्या वस्तू तुम्हाला विमानात मिळतात आणि त्या तुम्ही फ्रीमध्ये घरी नेऊ शकता.
1/7
विमानाने प्रवास करायला कुणाला आवडणार नाही. कित्येकांचं स्वप्न असतं की आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करावा. परदेशात जायचं म्हटलं की विमान प्रवास आलाच. आता विमान प्रवास तसा स्वस्त झाला आहे, त्यामुळे बहुतेकांना तो परवडण्यासारखा आहे.

advertisement
2/7
विमानाने प्रवास करताना काही नियम आहे. तसं आपण कुठे फिरायला निघालो की सोबत काही ना काही घेऊन जातो. काही वस्तू विमानात बॅन आहेत. पण विमानात अशा काही वस्तू मिळतात ज्या तुम्ही तुमच्या घरी नेऊ शकता, त्यासुद्धा फ्रीमध्ये. यात कोणकोणत्या वस्तूंचा समावेश आहे ते पाहुयात.

3/7
एअरलाइन हेडफोन्स सहसा स्वस्त आणि सामान्य असतात. परंतु एअरलाइन्स त्यांचा पुन्हा वापर करत नाहीत, म्हणून तुम्ही ते तुमच्यासोबत ठेवू शकता.

4/7
स्लीप मास्क, मोजे आणि टूथब्रश किट या छोट्या वस्तू तुमच्या बॅगेत सहज ठेवू शकता. हे एकदा वापरण्यासाठी असतं आणि विमान कंपन्या ते परत घेत नाहीत.

5/7
जर ब्लँकेट आणि उशा योग्य पॅकिंगमध्ये दिल्या गेल्या विशेषतः आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये तर ती तुमची प्रॉपर्टी. बरेच लोक त्यांच्या प्रवासाच्या किटमध्ये हे जोडतात.

6/7
जर तुम्हाला विमानात बिस्किटं, ड्रायफ्रुट्स किंवा चॉकलेट मिळाले तर तुम्ही ते सोबत घेऊन जाऊ शकता. हे तुम्ही दिलेल्या तिकिटाच्या पैशातच येतं, यासाठी तुम्हाला कोणीही अडवणार नाही.

7/7
आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांची डिझायनर मॅगझिन आणि मेनू कार्ड . यावर तुमचं नाव लिहिलेलं नाही, पण तुम्ही हे घरीही घेऊन जाऊ शकता.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement