सूरतच्या व्यापाऱ्याला आलं स्वप्न, 600 कोटींच्या हिऱ्यात दिसले गणपती बाप्पा, पाहा, PHOTOS
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी गणेशाच्या विविध प्रकारच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. यातच आता सुरतमधून एक अनोखी मूर्ती स्थापन करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मूर्तीची पूजा वर्षातून फक्त एकदा केली जाते. नेमका यामागची काय कहाणी आहे, याचबाबत जाणून घेऊयात. (बिन्नी पटेल/सूरत, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, 15 वर्षांपूर्वी व्यावसायिक कनुभाई आसोदरिया जेव्हा व्यवसायाच्या निमित्ताने बेल्जियम याठिकाणी गेले होते तेव्हा ते रफ डायमंड (कच्चा हिरा) घेऊन परतले होते. याचदरम्यान, त्यांच्या वडिलांना एक स्वप्न आले की, “या रफ डायमंडमध्ये गणेशजी आहेत.” जेव्हा त्यांनी या रफ डायमंडला अत्यंत नीट पाहिले तेव्हा त्यांना त्यात गणेशाची मूर्ती दिसली आणि तेव्हापासून ते या हिऱ्याची पूजा करत आहेत. या रफ डायमंडचे वजन 182.3 कॅरेट आणि 36.5 ग्रॅम आहे.
advertisement
विशेष बाब म्हणजे, सूरत येथील हे गणेशजी इतने मौल्यवान आहेत की, त्यांची पूजा आणि दर्शन संपूर्ण वर्षभरात फक्त एकच दिवस केले जाऊ शकते. कनुभाई यांनी गणेश चतुर्थीला आपल्या घरी जगातील सर्वात महागडा हिरा असलेल्या गणेशाची स्थापना केली. या हिऱ्याची नोंद लंडन येथे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने जगातील सर्वात अद्वितीय म्हणून केले आहे.
advertisement
advertisement
कनुभाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशाची ही मूर्ती रफ डायमंडपासून तयार झाली आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध कोहिनूर हिरा हा 105 कॅरेटचा आहे. तर हा रफ डायमंड म्हणजे कच्चा हिरा 182 डायमंडचा आहे, जो कोहिनूर हिऱ्यापेक्षाही मोठा आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ते गणेशाची ही मूर्ती कुणालाही द्यायला तयार नाहीत.
advertisement
advertisement