Mutton : मटण खरेदी करताना दुकानदाराला काय सांगायचं, मटणाचा कोणता भाग मागायचा?

Last Updated:
Mutton Buying Tips : मटण खरेदी करताना कोणता भाग मागायचा हे त्या डिशवर अवलंबून असतं. कोणता भाग कुठल्या पदार्थासाठी असतो, हे माहिती असायला हवं.
1/7
मटणाच्या दुकानात गेलात आणि मटण मागितलं की दुकानदार तुम्हाला विचारतो की काय हवं आहे? आता अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की नेमकं काय मागायचं. कारण मटणाचे बरेच भाग असतात. त्यानुसार त्याची किंमतही असते आणि त्याचा उपयोगही वेगवेगळा आहे. त्यामुळे मटण खरेदी करताना कोणता भाग मागायचा हे त्या डिशवर अवलंबून असतं. कोणता भाग कुठल्या पदार्थासाठी योग्य कसं ओळखायचं याची ही माहिती.

advertisement
2/7
मटण करी, रस्सा किंवा झणझणीत ग्रेव्ही करायची असेल तर रान म्हणजे लेग किंवा थाय आणि खांदा किंवा शोल्डर मागा. यात मांस आणि थोडी चरबी असते त्यामुळे रस्सा चविष्ट होतो. कुकर आणि हंडी दोन्हीत छान शिजतं.  रान खांद्याचं मिक्स मटण द्या, असं दुकानदाराला सांगायचं.

3/7
सुकं मटण, फ्राय करायचं असेल तर छातीचा भाग म्हणजे ब्रेस्ट रिब्स आणि  खांदा मागा. यात चरबी जास्त असतं त्यामुळे सुकेपणा येत नाही. फ्रायमध्येही चव टिकते

4/7
मटण पुलाव किंवा बिर्याणी करायची असेल तर रानचे मोठे तुकडे आणि लोईन म्हणजे कंबरेजवळचा भाग मागा. हे मऊ मांस असतं, तुकडे तुटत नाहीत. दुकानदाराला सांगताना बिर्याणीसाठी रानाचं मटण मोठ्या तुकड्यात द्या असं सांगा.

5/7
सूप किंवा रस्सा करायचं असेल तर हाडांसकट मटण, नेक म्हणजे मान आणि लेग म्हणजे पाय मागा. हाडांतून चव आणि पोषण येतं. सूप घट्ट आणि पौष्टीक होतो.

6/7
कबाब, टिक्का किंवा ग्रिल करायचं असेल तर कंबर आणि रानाचा आतला भाग म्हणजे टेंडर कट्स मागा. हाड कमी आणि मऊ मांस असतं. पटकन शिजतं.

7/7
लहान मुलं किंवा आजारी माणसांसाठी रानाचा मऊ भाग, कंबरेजवळचा मांसल भाग मागा. कडकपणा कमी असतो आणि पटकन पचतं.

Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement