Alcohol : दारू कशी प्यायची, पिणाऱ्यांनाही माहिती नाही योग्य पद्धत; ख्रिसमस, न्यू इअर पार्टीला अशी प्या
- Published by:Priya Lad
Last Updated:
आता ख्रिसमस, न्यू इअर येईल. हे दोन्ही दिवस म्हणजे पार्टी आलीच आणि पार्टी म्हणजे बऱ्याच ठिकाणी दारू आलीच. पण दारू कशी प्यायची हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
आपल्या देशात सर्वाधिक विकल्या जाणार्या दारूमध्ये व्हिस्कीचा क्रमांक लागतो. पण कदाचित काही टक्के लोकांना ते पिण्याची योग्य पद्धत माहित असेल. तज्ज्ञ म्हणतात व्हिस्की कधीही कोल्ड ड्रिंक, सोडा किंवा पाण्यासोबत पिऊ नये. तर ती थेट प्यावी. आता तुम्ही म्हणाल थेट प्यायलो तर ती जास्त नुकसानदायक ठरेल. तर तसं नाही. व्सिस्की थेट प्यायलात तरी शरीराला तेवढीच हानी होते जेवढी तुम्ही पाणी किंवा कोल्ड्रिंक्सबरोबर प्यायल्यास होते.
advertisement
तज्ज्ञ सांगतात दारूत कोल्ड्रिंक मिसळून प्यायल्यास लगेच नशा येते. पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही दारू आणि कोल्ड्रिंक एकत्र पिता तेव्हा तुमच्या शरीरात डिहायड्रेशन होतं. दुसरं म्हणजे तुम्हाला दारूच्या प्रमाणाचा अंदाज येत नाही, त्यामुळे दारू जास्त पिता. यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
advertisement
advertisement
काही लोक दारूसोबत पनीर किंवा चीज खातात, पास्ता, पिज्जा खातात. पण दुग्धजन्य पजार्थात प्रोटिनचं प्रमाण जास्त असतं. यासोबत दारू प्यायाल्याने पचनात समस्या येते. यामुळे पोटात जळजळ, अॅसिडीटी आणि उलट्या होऊ शकतात. दारूसोबत चिप्स, नाचोस खात असाल तर बंद करा तळलेले पदार्थ खाल्ल्याने तहान वाढते. त्यामुळे लोक जास्त प्रमाणात दारूचं सेवन करतात.
advertisement