महाकुंभमध्ये 30 कोटी कमावले, पण निघाला हिस्ट्रीशीटर, हत्येसह 21 गुन्हे, पिंटूची सगळी कुंडली आली समोर
- Published by:Priya Lad
Last Updated:
प्रयागराज महाकुंभमध्ये 30 कोटी रुपये कमवून चर्चेत आलेला पिंटू महारा आणि त्याचं कुटुंब वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलं आहे. पिंटू महारा आणि त्याच्या कुटुंबातील बहुतेक सदस्य हिस्ट्रीशीटर आहेत.
पिंटू महारा आणि त्याच्या कुटुंबाचा तसेच त्याच्या संपूर्ण कुळाचा इतिहास कलंकित आहे. कुटुंबप्रमुखासह कुटुंबातील बहुतेक सदस्य क्रूर गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे कुटुंब प्रामुख्याने बोट चालवणे, कंत्राट देणे, खंडणी देणे आणि बोटीवाल्यांकडून पैसे वसूल करणे, नद्यांमधून वाळू उपसा करणे आणि वाळू विक्री करणे यामध्ये गुंतलेले आहेत. असं म्हटलं जातं की जो कोणी काळा पैसा आणि गुंडगिरीच्या मार्गात येतो, हे लोक त्याला त्यांच्या मार्गावरून दूर करतात.
advertisement
पिंटू महाराविरुद्ध एकूण एकवीस गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न आणि खंडणीसह 21 गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरुद्ध पहिला खटला 2005 मध्ये दाखल झाला होता, तेव्हा तो फक्त 23 वर्षांचा होता. 2010 आणि 2016 मध्ये त्याच्यावर गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय 2013 आणि 2015 मध्ये गुंडा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
advertisement
advertisement
advertisement