Mobile Interesting Facts : मोबाईल Sleep Mode वर ठेवला की, बॅकग्राऊंडमध्ये होतात या 5 गोष्टी
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mobile Sleep Mode : आजच्या स्मार्टफोनच्या जगात Sleep Mode म्हणजे फक्त स्क्रीन बंद झालेली अवस्था नाही, तर एक अत्यंत स्मार्ट आणि तांत्रिक प्रक्रिया आहे. फोनची आतली प्रणाली सतत सक्रिय असते आणि अनेक बॅकग्राउंड कामं न थांबता सुरूच असतात.
advertisement
फोन स्लीप मोड मध्ये गेला की सीपीयू म्हणजे प्रोसेसर पूर्ण क्षमतेने काम करणं थांबवतो. याला लो पॉवर स्टेट म्हणतात. या मोडमध्ये CPU केवळ अत्यावश्यक कामं करतो. जसं की नोटिफिकेशन्स चेक करणं, नेटवर्क कनेक्शन सक्रिय ठेवणं, अ‍ॅप्सची छोटी कामं हाताळणं. ही सर्व कामं अत्यंत कमी ऊर्जेत पार पडतात. त्यामुळे बॅटरी लाइफ वाढते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
या अवस्थेत फोनकडे थोडा रिकामा वेळ असतो. त्याच वेळेत तो स्वतःची मेंटेनन्स कामं करतो. RAM आणि Cache ऑप्टिमाइज करणं, Unused processes बंद करणं, सिस्टम हेल्थ तपासणं, अ‍ॅप अपडेट्स Wi-Fi वर डाउनलोड करणे, अशी सिस्टमची हाऊसकिंपिंग कामं बॅकग्राऊंडमध्ये चालतात. ही कामं फोन आपोआप करतो, म्हणूनच फोन हँग होणं, स्लो होणं कमी होतं.
advertisement
फोनमधील काही सेन्सर हे स्क्रीन ऑफ असतानाही काम करतात. जसे की उदा. Accelerometer - स्टेप काउंटर, हँडलिंग मोशन, Gyroscope - फोन हलत आहे का ते तपासणं, Proximity Sensor - कॉलच्या वेळी चेहरा जवळ आल्यावर स्क्रीन बंद करणं, Ambient Light Sensor - स्क्रीन ऑन झाल्यावर ब्राइटनेस अ‍ॅडजस्ट करणं. यामुळे फोन प्रत्येक क्षणी तुमच्या हालचाली समजून घेत असतो.
advertisement
advertisement
थोडक्यात काय तर स्लीप मोड म्हणजे फोन बंद नव्हे, तर स्मार्टपणे ऊर्जा बचत करत असलेली अवस्था. या वेळी फोन नेटवर्कशी संपर्क ठेवतो, बॅकग्राउंड अ‍ॅप्स अपडेट करतो, सेन्सर डेटा रेकॉर्ड करतो, अलार्म/सूचना तयार ठेवतो, सिस्टम ऑप्टिमाइज करतो. म्हणूनच तुम्ही स्क्रीन ऑन करताच फोन तत्काळ, जलद आणि नेहमी तयार असतो. (सर्व फोटो : AI Generated)


