Mumbai Train Blast : अत्यंत गंभीर प्रकरणातील आरोपी निर्दोष कसे काय सुटतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mumbai Serial Blasts Case 2006 : मुंबईत 2006 साली ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. 19 वर्षे तुरुंगात असलेले इतक्या गंभीर प्रकरणातील आरोपी कसे काय सुटतात, असा प्रश्न पडतोच.
मुंबईतील 2006 सालातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व 12 आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. लोकलमधील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने हा मोठा निकाल दिला आहे. सत्र न्यायालयाने 5 जणांना फाशीची शिक्षा आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि त्यांची सुटका झाली.
advertisement
तब्बल 19 वर्षे हे 12 जण तुरुंगात होते. इतक्या वर्षांनी कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवलं आहे. हे प्रकरण काही साधं नव्हतं. यात 189 जण ठार झाले होते. तर 700 हून अधिक नागरिक जखमी झाले होते. इतक्या गंभीर प्रकरणातील आरोपी ज्यांना फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली ते निर्दोष कसे काय सुटतात असा प्रश्न पडतोच. याची अनेक कारणं आहेत.
advertisement
advertisement
advertisement