Missile Control System: मिसाईल एकदा लाँच झाली की 'नो टर्निंग बॅक'! पण चुकीचं टार्गेट झालं तर...?

Last Updated:
Missile Control System: सर्वसामान्यांच्या मनात एक नेहमीचा प्रश्न निर्माण होतो की एकदा मिसाइल डागली की तिला थांबवता येते का? तिचं टार्गेट नंतर बदलता येतं का? चला, याचं उत्तर थोडं सखोलपणे समजून घेऊया.
1/7
अलीकडेच भारत-पाकिस्तानमधील तणावाने पुन्हा एकदा उंचावलेला पहायला मिळाला. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ले करत दहशतवाद्यांचा खात्मा केला. विशेष बाब म्हणजे या हल्ल्यांमध्ये भारताने अत्याधुनिक मिसाइलचा वापर केला आणि प्रत्येक टार्गेट अचूक भेदला.

advertisement
2/7
अशा वेळेस सर्वसामान्यांच्या मनात एक नेहमीचा प्रश्न निर्माण होतो की एकदा मिसाइल डागली की तिला थांबवता येते का? तिचं टार्गेट नंतर बदलता येतं का? चला, याचं उत्तर थोडं सखोलपणे समजून घेऊया.

3/7
प्राचीन काळात आणि काही पारंपरिक युद्धांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅलिस्टिक मिसाइल्स (Ballistic Missiles) या एकदा डागल्यावर थांबवता येत नाहीत. त्यांचं टार्गेटही फिक्स असतं आणि त्याला वळवता येत नाही. भारताच्या 'अग्नी' आणि 'पृथ्वी' या मिसाइल्स याच प्रकारात मोडतात.

4/7
पण आधुनिक काळात युद्धतंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. आज क्रूझ मिसाइल्स (Cruise Missiles) चा वापर केला जातो ज्यामध्ये एक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असतं ते म्हणजे नेव्हिगेशन सिस्टीम. भारताची 'ब्रह्मोस' ही मिसाइल हे उत्तम उदाहरण आहे. ही मिसाइल एकदा डागली गेल्यानंतर तिला रीडायरेक्ट करता येऊ शकतं, म्हणजेच टार्गेट बदलता येऊ शकतं.

5/7
तरीही, हे लक्षात ठेवायला हवं की एकदा मिसाइल डागली गेल्यावर ती पूर्णपणे थांबवता येत नाही. जर एखाद्या चुकीच्या दिशेने ती गेली, तर टेक्नॉलॉजीच्या मदतीने तिला कमी धोक्याच्या भागात नेऊन स्फोट घडवून आणला जातो, जेणेकरून हानी कमी करता येईल.

6/7
मात्र, काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे (technical glitches) मिसाइलला योग्य वेळी वळवता येत नाही, आणि त्यामुळे ती चुकीच्या ठिकाणी जाऊन स्फोट करते. हे प्रकार अत्यंत कमी प्रमाणात घडतात, पण त्यामुळे झालेली हानी मोठी असू शकते.

7/7
युद्ध हे केवळ हत्यारांच्या जोरावर लढलं जात नाही, तर अचूक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि जबाबदारीने घेतलेले निर्णय या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. भारताची मिसाइल प्रणाली आता इतकी प्रगत झाली आहे की जगभरात तिचं नाव आदराने घेतलं जातं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement