बापरे बाप! महाराष्ट्रात आढळले 2 दुर्मीळ साप; सर्पतज्ज्ञ म्हणाले, चावले तर...

Last Updated:
जिथं हे दुर्मिळ साप आढळले, तिथं सरिसृपांच्या सुमारे 156 प्रजातींपैकी 97 प्रजाती या स्थानिक प्रजाती असून त्यापैकी 5 प्रजाती संकटग्रस्त मानल्या जातात.
1/5
गगनबावडा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. अमित सुमन तुकाराम पाटील पश्चिम घाटातील भुईबावडा घाट परिसरात फिरत होते. तेव्हा त्यांना पाण्यात एक साप दिसला. सुरुवातीला त्यांना तो पाणदिवड वाटला. ज्याला स्थानिक भाषेत विरोळा किंवा इरोळा म्हणतात. पण नंतर जवळून पाहिल्यावर तो वेगळा साप असल्याचं दिसलं.

advertisement
2/5
सर्पतज्ज्ञ वरद गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सापाचे नाव ऱ्हॅब्डोप्स अक्वॅटिका आहे. या सापाचा शोध 2017 साली लागला.  याचा पाठीकडील रंग गडद शेवाळी तपकिरी, तर पोटाचा रंग फिकट पिवळसर असतो. पाठीकडील भागावर शरीरभर काळे ठिपके असतात.

3/5
हा साप शक्यतो धबधब्यांच्या परिसरातील उथळ आणि संथ वाहणाऱ्या पाण्यात राहतो. दाट जंगलातील प्रवाहांजवळील खडकांखाली पाण्यात किंवा क्वचित खडकांवर बसलेला तो दिसेल. तो बिनविषारी आहे.  मासे हे त्याचं प्रमुख खाद्य आहे.

4/5
यानंतर करूळ घाट परिसरात वोल्फ स्नेक म्हणजे कवड्या सापांपैकी दुर्मिळ प्रजाती असणाऱ्या ‘त्रावणकोर कवड्या सापा’चंही अस्तित्व आढळून आलं. चकचकीत काळ्या म्हणजे जेट ब्लॅक किंवा गडद तपकारी रंगाच्या या सापाच्या अंगावर आडवे पिवळे पट्टे असल्याने तो अतिशय आकर्षक दिसतो. याचा पोटाकडील भाग पांढराशुभ्र असतो.

5/5
हा साप उंच डोंगरांच्या परिसरात आणि सदाहरित, पानझडी अशा दोन्ही प्रकारच्या जंगलांत आढळतो. भिंतींवर किंवा उंचावर चढण्याचं विशेष कसब त्याच्यात असतं. अतिशय चपळ हालचाली करणारा हा साप बिनविषारी आहे.  धोक्याची जाणीव होताच तो शरीराची एखाद्या चेंडूप्रमाणे गुंडाळी करतो आणि त्यात डोकं लपवून घेतो.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement