'जुदाई' फिल्मसारखा पत्नीने पतीचा केला सौदा! बायकोने गर्लफ्रेंडला दीड कोटीला विकला नवरा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Wife Sold Husband To Girlfriend : जुदाई फिल्म तुम्ही पाहिलीच असेल, ही रिल स्टोरी रिअलमध्येही घडली आहे. जिथं काही पैशांसाठी एका पत्नीने आपल्या पतीला त्याच्या गर्लफ्रेंडला विकलं आहे.
अनिल कपूर, श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर यांची जुदाई फिल्म तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच आहे. ज्यामध्ये काजल तिचा नवरा राजला जान्हवीला कोट्यवधी रुपयांसाठी विकते. ही फिल्म पाहिल्यावर अनेकांना हे फक्त फिल्ममध्येच होऊ शकतं असं वाटतं. प्रत्यक्षात कोणतीच पत्नी आपल्या पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहू शकत नाही, अगदी पैशांसाठीही नाही. असं वाटतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल जुदाई फिल्मसारखीच रिअल स्टोरी घडली आहे. एका महिलेने पैशांसाठी आपल्या नवऱ्याला त्याच्या गर्लफ्रेंडला विकलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
समुपदेशनादरम्यान पतीने सांगितलं की, त्याचं त्याच्या मुलांवर खूप प्रेम आहे, पण त्याला त्याच्या पत्नीसोबत राहायचं नाही. त्याची पत्नी त्याच्याशी दररोज भांडते, त्याला आता घरी जायचं नाही. त्याला त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन त्याच्या गर्लफ्रेंडसोबत राहायचं आहे. समुपदेशकांनाही या कपलमध्ये समेट घडवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते शक्य झालं नाही. शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं. (AI Generated Photo)
advertisement
पुरुषाच्या पत्नीने सांगितलं की तिला तिच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करायचं आहे. तिच्या मुली आणि स्वतःच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा विचार करून तिने एक डुप्लेक्स फ्लॅट आणि 27 लाख रुपये रोख रक्कम मागितली. तिच्या पतीच्या गर्लफ्रेंडने तिची ऑफर स्वीकारली. तिने तिला फ्लॅट आणि पैसे देऊन करार पूर्ण केला. (AI Generated Photo)








