Devendra Fadnavis : '..तर विधानसभेला 200 जागा येतील' देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला

Last Updated:

Devendra Fadnavis : आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुतीचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा मुंबईत पार पडला. यामध्ये भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेसाठी विजयाचा फॉर्म्युला सांगितला.

News18
News18
मुंबई, (राहुल प्रभू, प्रतिनिधी) : लोकसभेत झालेल्या मोठ्या परभवानंतर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी आपआपसांतच आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू होती. या परभवानंतर पहिल्यांदाच महायुतीच्या राज्यातील सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्याध्यक्षांच्या मेळाव्याच आयोजन करण्यात आलं. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात होत असून, या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत महायुतीचे मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित आहेत. या मेळाव्यात बोलताना विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 200 जागा सहज येतील असं सांगत त्यासाठीचा फॉर्म्युलाच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला.
महायुती कुठे कमी पडली?
फडणवीस म्हणाले, की लोकसभेत तांत्रिकदृष्ट्या आपला पराभव झाला असला तरी आपण आता मैदानात आलो आहोत. ते खोटं बोलत होते. मात्र, आपणही गाफील राहिलो. फेक नरेटिव्ह या चौथ्या विरोधकाशी आपल्याला लढावं लागलं. सत्य चिरकाळ जिवंत राहतं. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येईल दुसरी नाही. विरोधकांना खोटं बोलायची चटक लागलीय. विरोधक घरी तरी खरं बोलत असतील की नाही? असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
advertisement
तर आपण 200 जागा जिंकू : फडणवीस
नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. राजकारणात कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो. लोकसभेत मविआ म्हणे आमचा विजय झाला. मविआ 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली. आपण निर्धार केला तर किमान 20 लाख मते जास्त घेतली तर आपल्या 200 जागा येतील, असा दावा फडणवीस यांनी केला.
advertisement
वाचा - देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार मुख्यमंत्री! विठ्ठल महाराज शास्त्री यांचं भाकित
आपण सकारात्मकतेने सरकारी योजना जनतेपुढे घेऊन गेलो तर आपला पराभव शक्य नाही. आपण योजनांची माहिती देतो आणि ते सकाळी येऊन काही तरी वेडं वाकडं बोलतील, माध्यमं तेच दाखवतील. आपल्याला सातत्याने चांगलं जनतेसमोर मांडलं पाहिजे. लाडकी बहीण योजनेला नाव ठेवणारे विरोधकच फॉर्म घेऊन घराघरात फिरत आहेत. अशा बेगडी भावांपासून सावध राहावं लागेल. लाडकी बहीण योजनेत आता कुठल्याही अटी शर्ती नाहीत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/Politics/
Devendra Fadnavis : '..तर विधानसभेला 200 जागा येतील' देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला विजयाचा फॉर्म्युला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement