Can Evms Be Hacked : EVM हॅक होऊ शकते का? एलॉन मस्कच्या दाव्यात किती तथ्य?

Last Updated:

Can Evms Be Hacked : ईव्हीएम मशीनवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. मात्र, ते खरच हॅक केले जाऊ शकतात का?

ईव्हीएम मशीन
ईव्हीएम मशीन
मुंबई : देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये वापरण्यात आलेल्या ईव्हीएमवर आता शंका घेतल्या जात आहे. टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते, असा दावा केल्याने भारतात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ईव्हीएम मशीनच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मात्र, ईव्हीएमच्या बाजूने आणि विरोधात दोन्ही बाजूंनी वाद सुरू आहेत. निवडणुकीपूर्वीच यासंबंधीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने विविध तांत्रिक आधारावर हे यंत्र हॅक करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सिद्ध केलं होतं. मात्र, खरच ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते का?
मतपेटी सुरक्षित की ईव्हीएम?
ईव्हीएमपूर्वी आपल्या देशात निवडणुका मतपेटीतून घेतल्या जात होत्या. मतदार कागदावर शिक्का मारून त्या मतपेटीत टाकत. त्यानंतर सर्व मतपत्रिका एकाच ठिकाणी ठेवून मोजणी करण्यात येत होती. मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात येत होता. ही संपूर्ण प्रक्रिया मॅन्युअल होती. यासाठी बराच वेळ खर्ची होत होता. काही वेळा सर्व निकाल येण्यासाठी 2 ते 3 दिवस लागल होते. त्यानंतर ईव्हीएममध्ये सर्व कामे वेगाने होऊ लागली. ईव्हीएमच्या वापराचा इतिहास जुना आहे. 1974 मध्ये कॅलिफोर्निया, यूएसए येथे स्थानिक निवडणुकांमध्ये याचा प्रथम वापर करण्यात आला. यानंतर इलिनॉय, शिकागो येथे चांगल्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला. 1975 मध्ये या मशीन्सचा अहवाल तयार करण्यासाठी अमेरिकन सरकारने एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली.
advertisement
भारतात पहिल्यांदा वापर कधी?
ईव्हीएमचा भारतात पहिल्यांदा वापर 1982 मध्ये केरळमधील पोटनिवडणुकीत करण्यात आला. परंतु, न्यायालयाने या मशीन्सचा वापर नाकारला होता. 1991 मध्ये, बेल्जियम हा पहिला देश होता, जिथे निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे वापरली गेली. पण खऱ्या अर्थाने तिथेही त्याचा पुरेपूर वापर 1999 पासून सुरू झाला. 1982 मध्ये भारतात पहिल्यांदा वापर झाल्यानंतर, 2003 च्या निवडणुकीत त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला.
advertisement
80 च्या दशकात, भारत सरकारच्या सूचनेनुसार, देशातील दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, ई-व्होटिंग मशीनवर काम करू लागले. हे यंत्र विकसित केल्यानंतर त्यांनी भारताच्या निवडणूक आयोगाकडे याबाबत मत मागवले. निवडणूक आयोगाच्या समितीने त्यास काही सुधारणांसह मान्यता दिली आणि रचनेत काही बदल सुचवले. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन कंपनीद्वारे देशात अजूनही ईव्हीएमची निर्मिती केली जाते. काही देशांमध्ये याची निर्यातही केली जाते. या मशीनद्वारे होणारी निवडणूक मतपेटीपेक्षा स्वस्त आहे.
advertisement
ईव्हीएम विजेशिवाय काम करू शकतात का?
होय, त्यांना कोणत्याही प्रकारची वीज लागत नाही. हे त्यांना जोडलेल्या बॅटरीवर चालतात.
ईव्हीएममध्ये किती मते नोंदवता येतात?
भारतीय निवडणूक आयोग वापरत असलेली ईव्हीएम मशीन 2000 मते नोंदवू शकतात.
मेमरीमध्ये डेटा किती काळ राहतो?
मतांचा डेटा ईव्हीएमच्या कंट्रोल युनिटच्या मेमरीमध्ये दीर्घकाळ रेकॉर्ड केला जाऊ शकतो, त्याच्या मेमरी डेटावर परिणाम होत नाही.
advertisement
EVM वर सुप्रीम कोर्टाचा निर्णय
EVM वर सुप्रीम कोर्टाचा निर्णय
ईव्हीएमचं आयुष्य किती असते?
सामान्यपणे 16 ते 17 वर्षे एका मशीनचे आयुष्य असते.
एका ईव्हीएममध्ये किती उमेदवारांची नावे नोंदविली जाऊ शकतात?
पूर्वी M2 EVM यायचे, प्रत्येक युनिटला 16 उमेदवार निवडण्यासाठी बटणे असायची, जर जास्त उमेदवार असतील तर वेगळे युनिट बसवावे लागे. आता वापरल्या जाणाऱ्या M3 मशीनमध्ये आणखी युनिट्स जोडता येतात.
advertisement
या मशीनची किंमत किती आहे?
M2 EVM ची किंमत 8670 रुपये आहे तर M3 EVM ची किंमत 17000 रुपये आहे.
ईव्हीएममध्ये फेरफार होऊ शकतो का?
नाही, ते शक्य नाही. प्रत्येक मतानंतर कंट्रोल युनिटला पुढील मतदानासाठी तयार राहावे लागते. त्यामुळे त्यांना पटकन बटण दाबून मतदान करणे अवघड झाले आहे.
advertisement
ही मशीन हॅक होऊ शकतात का?
ही यंत्रे कोणत्याही इंटरनेट नेटवर्कशी जोडलेली नसल्याने ती हॅक करणे शक्य नाही. या मशीन्सची स्वतःची फ्रिक्वेन्सी आहे, ज्याद्वारे ती हॅक केली जाऊ शकतात, असा दावाही करण्यात आला होता. परंतु, असे दावे खरे ठरले नाहीत. पण एक गोष्ट सांगितली जाते की मशीनमध्ये फिजिकली फेरफार केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की जर कोणाच्या हातात हे मशीन सापडले तर तो त्याचे परिणाम बदलू शकतो.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
ईव्हीएमबाबत आतापर्यंत किती खटले दाखल झाले?
आतापर्यंत अनेक राज्यांच्या उच्च न्यायालयात ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याप्रकरणी अनेक खटले दाखल करण्यात आले आहेत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले पण सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळून लावले.
EVM निकाल सहसा किती काळ सुरक्षित ठेवतात?
मतमोजणीनंतर ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये बंद करून सुरक्षित ठेवले जातात. त्याचा डेटा निवडणूक याचिकेच्या वेळेपर्यंत हटवला जात नाही.
मराठी बातम्या/Politics/
Can Evms Be Hacked : EVM हॅक होऊ शकते का? एलॉन मस्कच्या दाव्यात किती तथ्य?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement