Lalu Prasad Yadav : 'पुढच्या महिन्यात दिल्लीत भूकंप', केंद्रबिंदू बिहार? लालूंची मोठी भविष्यवाणी

Last Updated:

आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची भविष्यवाणी केली आहे. केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार कमजोर असून ते एका महिन्यात ऑगस्टमध्ये पडू शकतं, असा खळबळजनक दावा लालू यादव यांनी केला आहे.

News18
News18
पटणा : आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाची भविष्यवाणी केली आहे. केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार कमजोर असून ते एका महिन्यात ऑगस्टमध्ये पडू शकतं, असा खळबळजनक दावा लालू यादव यांनी केला आहे. आरजेडीच्या स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात लालू प्रसाद यादव यांनी सरकार पडण्याचा दावा केला आहे. आरजेडीला 28 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उपलक्ष्यमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं. या कार्यक्रमाला लालू प्रसाद यादव यांचे छोटे पूत्र माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही उपस्थित होते.
लालू प्रसाद यादव यांचा हा दावा भाजपने मात्र फेटाळून लावला आहे. लालू यादवना मतीभ्रम होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लोकांनी विश्वासाला पुष्टी दिली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना लालू यादव यांनी कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहा, असं सांगितलं आहे. मागच्या बऱ्याच काळापासून बिहार विधानसभेत आम्ही सगळ्यात मोठा पक्ष आहोत. इतर पक्षांप्रमाणे आम्ही कधीच विचारधारेसोबत समझौता केला नाही, असं लालू प्रसाद यादव म्हणाले.
advertisement
एनडीएचे बहुतेक नेते भाजपच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, जिकडे बिहारमधल्या नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार केला जात होता, तेव्हा लालूंनी ही भविष्यवाणी केली आहे. बिहारमधले भाजप नेते नित्यानंद राय यांनी लालूंच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे. 'लालू मुंगेरी लाल के हसीन सपने पाहत आहेत. लोकांनी मोदींना मत दिलं आहे, ते आता रेकॉर्ड तिसऱ्यांदा सत्तेत आहेत. मोदींचं नेतृत्व आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली बिहारमध्ये एनडीए विरोधकांना पराभूत करेल', असं नित्यानंद राय म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/Politics/
Lalu Prasad Yadav : 'पुढच्या महिन्यात दिल्लीत भूकंप', केंद्रबिंदू बिहार? लालूंची मोठी भविष्यवाणी
Next Article
advertisement
अखेर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची घोषणा, पण..., शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट
  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

  • अखेर महापालिकासाठी महायुतीची घोषणा, पण... रविंद्र चव्हाणांनी दिली मोठी अपडेट

View All
advertisement