मविआनंतर महायुतीही फूट? अजित पवार गटाच्या बड्या नेत्यानेही दिला स्वबळाचा नारा

Last Updated:

महाविकास आघाडीत ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिल्यानंतर महायुतीत अजित पवार गटाने देखील स्वतंत्र निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

News18
News18
मुंबई : शनिवारी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबईसह पुणे, ठाणे आणि नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राऊतांनी केली. राऊतांच्या या घोषणेनंतर अंबादास दानवे, अरविंद सावंत यांसारख्या नेत्यांनी त्यांचं समर्थन केलं. संजय राऊतांची भूमिका हीच पक्षाची अधिकृत भूमिका मानली जात आहे. ठाकरे गटाने असं अचानक स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीत भूकंप आला असून महाविकास आघाडी फुटल्याचं बोललं जातंय.
महाविकास आघाडीतील या फुटीनंतर आता महायुतीदेखील फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. कारण अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवली पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत मुंबईत राष्ट्रवादीचे 14 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले नाहीत. हे चित्र बदलायचं असेल तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढवायला हवी, अशी मागणी मलिक यांनी लावून धरली.
advertisement
शनिवारी मुंबईतील माटुंगा परिसरात राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नवाब मलिक यांच्यासह त्यांच्या कन्या आणि आमदार सना मलिक आणि सिद्धार्थ कांबळे असे नेते उपस्थित होते. या बैठकीत मलिक यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी लावून धरली.
नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?
जोपर्यंत एखाद्या पक्षाची ताकद नसते, तोपर्यंत त्या पक्षाला कोणीही विचारत नाही. आज मित्र पक्ष तुम्हाला सोबत घेईल हे विसरून जा. तुमची ताकद असेल तरच मित्र पक्षही तुम्हाला विचारेल. त्यामुळे तुम्हाला मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावीच लागेल. तुम्हाला तुमची ताकद निर्माण करावीच लागेल, असं नवाब मलिक म्हणाले.
advertisement
नवीन लोकं जोडल्याशिवाय पक्ष वाढत नाही. तुम्हाला वाटत असेल भाजपसोबत जायचं आहे. पण भाजप कायमच आपल्यासोबत राहील, असं वाटत असेल तर हा विचार सोडून द्या. राजकारणात कोणीही कुणासोबत कायम राहत नाही. जो ताकदवान असतो त्यालाच लोकं विचारतात. ताकद नसेल तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. त्यामुळे मुंबईत आपली ताकद निर्माण करायची असेल तर आपण स्वबळावर लढून मुंबईत वेगळा ठसा निर्माण करू शकतो. आपले 14 पेक्षा जास्त नगरसेवक आले नाही, हा आपल्यावरचा ठपका आहे. आपण व्यवस्थित लढलो आणि बुथवर 100 मतांची ताकद निर्माण केली तर आपण जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणू शकतो. आपल्यावरचा हा ठपका पुसून टाकला जाऊ शकतो, असंही मलिक म्हणाले.
advertisement
मलिक यांच्या मागणीनंतर आता महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरून मोठ्या प्रमाणावर रस्सीखेच बघायला मिळाला होता. विधानसभेत संधी न मिळाल्याने घटकपक्षांचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले होते. ही नाराजी दूर करण्यासाठी प्रत्येक पक्षाला वेगळा निर्णय घ्यायला लागू शकतो. मलिक यांच्या विधानावर आता शिंदे गट आणि भाजप काय भूमिका घेणार, तेही पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/Politics/
मविआनंतर महायुतीही फूट? अजित पवार गटाच्या बड्या नेत्यानेही दिला स्वबळाचा नारा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement