'जरांगे पॅटर्न'चा कुणाला फायदा? पाटलांच्या जालन्यातील समीकरण नेमकं काय?

Last Updated:

मराठवाड्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून जालना विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर अशी पारंपारिक लढत आहे. तरी या दोन्ही उमेदवारांना बंडखोरीचा फटका बसणार आहे.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. मराठवाड्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून जालना विधानसभा मतदारसंघ ओळखला जातो. या मतदारसंघातून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आणि शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर अशी पारंपारिक लढत आहे. तरी या दोन्ही उमेदवारांना बंडखोरीचा फटका बसणार आहे.
भाजपाचे अशोक पांगरकर तर काँग्रेसच्या अब्दुल हफिज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी केल्याने दोन्ही प्रमुख उमेदवारांचं टेन्शन वाढलं आहे. वंचित बहुजन आघाडीने डेव्हिड घुमारे यांना उमेदवारी दिली आहे. 70 टक्के शहरी आणि 30 टक्के ग्रामीण मतदार असलेल्या जालना मतदारसंघांमध्ये जातीय समीकरणे कशी आहेत? बंडखोरीचा कोणत्या उमेदवाराला सर्वाधिक फटका बसेल? जरांगे पाटलांचा फायदा कुणाला होईल? कोणत्या समाजावर कोणत्या उमेदवाराची भिस्त आहे? याबाबत लोकल 18 च्या प्रतिनिधीने जालना शहरातील ज्येष्ठ पत्रकार सुरेश केसापूरकर यांच्याशी संवाद साधला पाहुयात.
advertisement
जातीय समीकरण जालना शहरामध्ये मराठा, ओबीसी, दलित आणि मुस्लिम या पारंपारिक मतदारांबरोबर गुजराती, राजस्थानी, मारवाडी, ब्राह्मण, गवळी, सिंधी, उत्तर भारतीय, सुवर्णकार अशा समाजाचा देखील प्रभाव राहिला आहे. मतदार संघामध्ये मराठा मतदार 50 हजार, दलित मतदार हे 60 हजारांच्या आसपास आहेत. ओबीसी मतदार हा 90 हजार, मुस्लिम 64 हजार आहे. तर उच्चवर्णीय मतदार देखील 50 ते 60 हजारांच्या आसपास आहे.
advertisement
विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल व्यापारी कुटुंबातील असल्याने शहरातील उच्चवर्णीय मतदारांबरोबरच ओबीसी, मुस्लिम आणि दलित मोठ्या संख्येने गोरंट्याल यांच्या बाजूने उभे राहिल्याचं मागील निवडणुकीचा इतिहास आहे. शहरी मतदारांवर कैलास गोरंट्याल यांची पकड मजबूत असल्याचं पहायला मिळतं. तर अर्जुन खोतकर हे शेतकरी कुटुंबातील असून विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. यामुळे अर्जुन खोतकर यांच्या पाठीमागे ग्रामीण भागातील मतदार मोठ्या संख्येने उभा राहत असल्याचं दरवेळीच्या निवडणुकीमधील चित्र असतं. त्याचबरोबर शहरी मतदारांमध्ये देखील खोतकर यांनी चांगलाच जम बसवला आहे, असं सुरेश केसापूरकर यांनी सांगितलं.
advertisement
बंडखोरीचं दोन्ही उमेदवारांना टेन्शन जालना विधानसभा मतदारसंघांमध्ये बंडखोरी झाल्याने दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशोक पांगारकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने अर्जुन खोतकर यांच्या मतांमध्ये यामुळे कपात होईल. तर अब्दुल हाफिज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्याचा फटका कैलास गोरंट्याल यांना सहन करावा लागेल.
मनोज जरांगे पाटलांचा इफेक्ट जरांगे पाटलांच्या आंदोलनाचे केंद्र जालना जिल्हा राहिल्याने जिल्ह्यातील अनेक मंडळी आंदोलनात सक्रिय सहभागी राहिले आहेत. यामुळे निश्चितच जरांगे पाटील यांचा प्रभाव मतदारावर राहील. लोकसभा निवडणुकीप्रमाणे ध्रुवीकरण होणार नसलं तरी जरांगे इफेक्टचा काही प्रमाणात अर्जुन खोतकर यांनाच फायदा होईल, असंही सुरेश केसापूरकर यांनी सांगितलं.
view comments
मराठी बातम्या/Politics/
'जरांगे पॅटर्न'चा कुणाला फायदा? पाटलांच्या जालन्यातील समीकरण नेमकं काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement