Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Uddhav Thackeray : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
मुंबई : विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आल्या असून प्रत्येक पक्ष मोर्चेबांधणी करत आहे. अशात मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव खासदार संजय राऊत यांनी यांच्याकडून पुढे केलं जात आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण राहील? यावर प्रतिक्रिया दिलीय.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार याबाबत खुद्द उद्धव ठाकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. महायुतीच्या अपयशाचा खरा धनी कोण ते समोर येऊ द्या, त्यानंतर योग्यवेळी आम्ही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर आणू. आमचा चेहरा राज्यातील जनता आहे, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांचा दावा काय?
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बिन चेहऱ्याने मतदान मागणे हे धोक्याचे आहे. मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाण्याचा धोका आहे. राज्याने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले काम पाहिले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा ला जे यश मिळाले, ते त्यांच्या चेहऱ्यामुळेच, असा दावा राऊतांनी (Sanjay Raut) केला आहे. त्यावर ठाकरे यांनी हे स्पष्टीकरणं दिले आहे.
advertisement
या सरकारचे निरोपाचे अधिवेशन : ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. या सरकारचे निरोपाचे अधिवेशन सुरू आहे. या सरकारकडून शेवटचे अधिवेशन असून अर्थसंकल्पातून गाजर दिलं जाणार आहे. योजनांचा पाऊस उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून होईल. सरकारने या योजनांच्या उद्या घोषणा करण्यापेक्षा अगोदर का नाही केले? हे दोन्ही सरकार गळती सरकार आहे. पेपर फुटी आणि मंदिरांमध्ये गळती होत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न आमच्याकडून अधिवेशनात उपस्थित केले जातील. रोज एक शेतकरी आत्महत्या करतो आहे. मुख्यमंत्र्यांची पंचतारांकित शेती आहे. अमावस्या पौर्णिमेला वेगळं पीक काढतात, अशी मला माहिती आहे, अशी टीका ठाकरेंनी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 27, 2024 3:59 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंनी केलं स्पष्ट