Anil Deshmukh : 'तर अनिल देशमुखांचे डिपॉझिट जप्त होईल' अजित पवारांच्या आमदाराचं आव्हान, म्हणाले

Last Updated:

Anil Deshmukh : अजित पवार गटाचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे अनिल देशमुख यांना विधानसभा लढवण्यासाठी आव्हान.

News18
News18
गोंदिया, (रवी सपाटे, प्रतिनिधी) : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अनेक राजकीय नेत्यांचे सध्या राज्यभर दौरे सुरु आहेत. कोणी यात्रा काढतंय तर काहींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे. विधानसभा मतदारसंघात उमेदवार चाचपणीदेखील सुरू आहे. अशात आव्हान-प्रतिआव्हान दिले नाही तरच नवल. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांना रिंगणात उतरवण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी देशमुखांना त्यांच्या विरोधात उभे राहण्याचं आव्हान दिलं आहे.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे आव्हान
“अनिल देशमुखांनी माझ्या विरोधात अहेरी मतदारसंघातून निवडणूक लढावी”, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं. तसेच जर आपल्याला पक्षाने सांगितलं तर त्यांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघामधूनही आपण निवडणूक लढवू शकतो, असंही धर्मरावबाबा आत्राम म्हणाले. अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढतील अशी चर्चा आहे. यावर बोलताना धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, “अनिव देशमुखांनी माझ्या अहेरी मतदारसंघामधून माझ्या विरोधात निवडणूक लढवली पाहिजे. ते विदर्भातील चांगले नेते आहेत. त्यामुळे त्यांना माझ्या विरोधात उभं राहायला काही अडचण नाही. असं आव्हान धर्मरावबाबा आत्राम यांनी अनिल देशमुख यांना दिलं आहे.
advertisement
बाबा आत्राम खूप छोटा आहे, अनिल देशमुख यांचा खोचक टोला
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी अनिल देशमुख हे फडणवीस यांच्या विरुद्ध लढतील तर त्यांची जमानत जप्त होईल, असा वक्तव्य केलं होतं यावर अनिल देशमुख यांनी बाबा आत्राम खूप छोटा आहे, असा खोचक टोला लगावला.
view comments
मराठी बातम्या/Politics/
Anil Deshmukh : 'तर अनिल देशमुखांचे डिपॉझिट जप्त होईल' अजित पवारांच्या आमदाराचं आव्हान, म्हणाले
Next Article
advertisement
Eknath Shinde BJP: पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद्र चव्हाणांनी एका वाक्यात सांगितलं....
पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद
  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

  • पक्षाची फोडाफोडी केली, वाद घातले... ठाणे-कडोंमपामध्ये महायुतीचं काय होणार, रविंद

View All
advertisement