वारं बदललं! माजी खासदार होणार का आमदार? का उमलणार कमळ? संभाजीनगर पूर्वचा ग्राऊंड रिपोर्ट
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच नेते कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच नेते कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील पूर्व मतदार संघामध्ये भाजपाकडून अतुल सावे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे लहुजी शेवाळे हे उभे आहेत. याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरमधील पूर्व मतदार संघातील नागरिकांची लोकल 18 च्या प्रतिनिधीने मते जाणून घेतली.
advertisement
पूर्व मतदार संघात कोण मारणार बाजी?
छत्रपती संभाजीनगर शहरामधील पूर्व मतदार संघातील जे नागरिक आहेत त्यापैकी अनेकांचे असं म्हणणं आहे की अतुल सावे हे निवडून येतील. कारण त्यांनी अनेक काम ही मतदारसंघांमध्ये केलेली आहेत. यामध्ये पाणी प्रश्न, त्यासोबत ड्रेनेचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न हे सर्व प्रश्न त्यांनी मार्गी लावून चांगला विकास केलेला आहे.
advertisement
तर तरुण आहेत त्यांचं म्हणणं आहे की, आम्ही जातीच्या मुद्दयांवरती मतदान करू म्हणजे आम्हाला हिंदुत्वाच्या मुद्दयांवरती मतदान करायचं. काही तरुणांनी रोजगारच्या मुद्दयांवर देखील मतदान करायचं ठरवलेलं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये चुरशीचा सामना, 3 मतदारसंघात कोणता फॅक्टर महत्त्वाचा?
view commentsअनेक नागरिकांचे असं म्हणणं आहे की आम्ही लहुजी शेवाळे यांना याआधी कधीच मतदार संघामध्ये बघितले नाही. किंवा त्यांनी काही काम केलेले नाहीत. राहिला प्रश्न इम्तियाज जलील यांचा ते मागच्या टर्ममध्ये दुसऱ्या मतदारसंघामधून उभे होते. त्यामुळे त्यांचा मतदारसंघच नाही आणि त्यांनी नागरिकांशी येऊन संवाद देखील साधलेला नाही, असे देखील इथल्या नागरिकांचे म्हणणं आहे. त्यामुळे पूर्व मतदार संघामध्ये कोण बाजी मारेल हे बघणं महत्त्वाचं आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 15, 2024 4:18 PM IST
मराठी बातम्या/Politics/
वारं बदललं! माजी खासदार होणार का आमदार? का उमलणार कमळ? संभाजीनगर पूर्वचा ग्राऊंड रिपोर्ट









