तरूणांना मोठी संधी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून 61 कोर्सेस मोफत शिकवणार; असा करा अर्ज
- Reported by:Pooja Satyavan Patil
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या शैक्षणिक योजना जाहीर केल्या आहेत. ‘जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना’ ही योजना ट्रस्टने 2010 मध्ये सुरू केली आहे.
प्रतिनिधी: पूजा सत्यवान पाटील
पुणे: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या शैक्षणिक योजना जाहीर केल्या आहेत. ‘जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजना’ ही योजना ट्रस्टने 2010 मध्ये सुरू केली असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गुणवंत विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी ती राबवली जाते. सध्या या योजनेअंतर्गत पुण्यातील 55 मराठी शाळांमधील 550 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व ट्रस्टकडून स्वीकारले आहे.
advertisement
‘जय गणेश विद्यार्थी पालकत्व’ योजनेंतर्गत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून विद्यार्थ्यांसाठी 61 मोफत कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कोर्सेस आणि योजनांविषयीची माहिती अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.
अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले की "श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रांतील अनेक कोर्सेस पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत."
advertisement
"यामध्ये बीबीए, बिझनेस डेव्हलपमेंट, स्पर्धा परीक्षा, UPSC–MPSC, डिजिटल मार्केटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्युटीशियन, टेक्निशन, फॅशन डिझाइनिंग, इलेक्ट्रिशियन, टॅली अशा एकूण 61 कोर्सेसचा समावेश करण्यात आला आहे. या कोर्सेसचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर भरलेला फॉर्म संबंधित प्रशिक्षण केंद्रात जमा करायचा आहे. या उपक्रमांमुळे शेकडो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत."
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 8:12 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
तरूणांना मोठी संधी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून 61 कोर्सेस मोफत शिकवणार; असा करा अर्ज








