उद्योगनगरी प्रदुषणाच्या विळख्यात! पिंपरी-चिंचवडमध्ये प्लॅन ठरला, या प्रकल्पांना थेट टाळंच ठोकलं!

Last Updated:

Pimpri Chinchwada: उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहराला प्रदुषणाने विळखा घातला आहे. त्यामुळे महापालिकेचा पर्यावरण विभाग सतर्क झाला असून आता धडक कारवाई सुरू केली आहे.

उद्योगनगरी प्रदुषणाच्या विळख्यात! पिंपरी-चिंचवडमध्ये प्लॅन ठरला, या प्रकल्पांना थेट टाळंच ठोकलं!
उद्योगनगरी प्रदुषणाच्या विळख्यात! पिंपरी-चिंचवडमध्ये प्लॅन ठरला, या प्रकल्पांना थेट टाळंच ठोकलं!
पुणे: गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड भागातील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. यामुळे महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे. प्रदूषणाला रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताथवडे, पुनावळे, पिंपळे, निलख आणि मोशी परिसरातील नऊ आरएमसी प्रकल्पांना टाळे ठोकले आहेत. तसेच वायुप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केल्याबद्दल आणखी 30 प्रकल्पांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवड प्रदूषणाच्या विळख्यात 
उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडचा विकास झपाट्याने होत आहे. हा विकास होत असतानाही पर्यावरणाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी अत्यंत कठोर नियम घालून दिले आहेत, पण अनेक प्रकल्प चालवणारे या नियमांचे उल्लंघन करत आहेत.
advertisement
प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायुप्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील 30 प्रकल्पांची यादी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिली आहे. शहरातील पर्यावरणविषयक समस्या आणि तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महापालिकेने दोन तपासणी पथकांची नेमणूक केली आहे.
तपासणी पथकांनी ताथवडे, पुनावळे, पिंपळे, निलख आणि मोशी परिसरातील आरएमसी प्रकल्पांची तपासणी केली. त्यात नऊ प्रकल्पांमध्ये ‘वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टम’ नसणे, मिक्सिंग खुल्या जागेत करणे, आणि खडी, वाळू व क्रश सँड वाहतुकीदरम्यान ताडपत्रीचा वापर न करणे अशी उल्लंघने आढळली. या प्रकल्पांमुळे हवेची गुणवत्ता खराब होत असल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे पर्यावरण विभागाने तात्काळ कारवाई करत या प्रकल्पांवर टाळे ठोकले आहे.
advertisement
आरएमसी प्रकल्पांबाबत कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल यांनी सांगितले की, प्रकल्पाच्या परिसरात धूळ नियंत्रणासाठी वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टम वापरावी, मिक्सिंग काम बंद जागेत करावे, खडी, वाळू आणि क्रश सँड वाहतूक करणाऱ्या वाहनांना ताडपत्रीने झाकावे, तसेच आरएमसी प्रकल्प मर्यादित वायुप्रदूषणाच्या पातळीतच कार्यान्वित ठेवावेत. प्रकल्पाच्या परिसरातील ध्वनीची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावी, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
उद्योगनगरी प्रदुषणाच्या विळख्यात! पिंपरी-चिंचवडमध्ये प्लॅन ठरला, या प्रकल्पांना थेट टाळंच ठोकलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement