IND vs SA 1st Test : भारताने 2 दिवस गाजवले पण फक्त 4 तासात टेम्बाने फिरवली मॅच, WTC चॅम्पियन्सचा कोलकाता टेस्टमध्ये विजय!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
India vs South Africa Kolkata Test :साऊथ अफ्रिकेने दुसऱ्या डावात 153 धावा केल्या. त्यानंतर आता टीम इंडिया 93 धावांवर ऑलआऊट झाली आहे.
IND vs SA 1st Test in Kolkata : कानामागून आला अन् तिखट झाली, अशी म्हण भारतात वापरली जाते. मात्र, ही म्हण साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बावुमा याच्यासाठी परफेक्ट ठरली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला गेला. या सामन्यात WTC चॅम्पियन्स साऊथ अफ्रिकेने विजय मिळवला आहे.
दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 159 धावांवर ऑलआऊट झाली, ज्याच्या प्रत्युत्तरात भारताने 189 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला 30 धावांची लीड मिळाली होती. साऊथ अफ्रिकेने दुसऱ्या डावात 153 धावा केल्या. त्यानंतर आता टीम इंडिया 93 धावांवर ऑलआऊट झाली आहे. त्यानंतर आता साऊथ अफ्रिकेने 30 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे सिरीजमध्ये पाहुण्या संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
advertisement
भारत: यशस्वी जायसवाल, केएल राहुल, वाशिंगटन सुंदर, शुभमन गिल (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), रविंद्र जड़ेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
साउथ अफ्रीका: एडेन मार्करम, रयान रिकेल्टन, वियान मुल्डर, तेंबा बावुमा (कॅप्टन), टोनी डी जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरिन (विकेटकीपर), साइमन हार्मर, मार्को जानसन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
November 16, 2025 2:23 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 1st Test : भारताने 2 दिवस गाजवले पण फक्त 4 तासात टेम्बाने फिरवली मॅच, WTC चॅम्पियन्सचा कोलकाता टेस्टमध्ये विजय!


