वहिनीला चहा बनवायला सांगितला; मग हळूच मागे किचनमध्ये गेला अन् धक्कादायक कांड, दिराला आता घडली अद्दल
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पीडितेचे पती सुरक्षारक्षक म्हणून कामावर गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास आरोपी चुलत दीर घरी आला. पीडितेने त्याला आदराने चहा दिला
पुणे : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना बारामतीत उघडकीस आली. याप्रकरणी न्यायालयाने गुन्हेगाराला कठोर शिक्षा सुनावली आहे. यात एका दिराने घरात एकटी असलेल्या वहिनीला चहा करायला सांगून फायदा घेत अत्याचार केला. याप्रकरणी ४३ वर्षीय चुलत दिराला बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना १४ जून २०२४ रोजी बारामतीमधील प्रगतीनगर परिसरात घडली. पीडितेचे पती सुरक्षारक्षक म्हणून कामावर गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास आरोपी चुलत दीर घरी आला. पीडितेने त्याला आदराने चहा दिला. मात्र, दुपारी साडेतीनच्या सुमारास पीडिता पुन्हा चहा करण्यासाठी गॅसजवळ गेली असता, आरोपीने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. एवढेच नाही तर कोणाला काही सांगितल्यास 'जीवे मारण्याची' धमकीही दिली.
advertisement
पीडितेचा धाडसी लढा
धमकीने न घाबरता पीडितेने तातडीने पतीच्या कामाचे ठिकाण गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटल्यादरम्यान आरोपीने आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा बनाव केला, मात्र पीडितेची साक्ष अत्यंत ठोस आणि विश्वासार्ह ठरली.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी निकाल देताना स्पष्ट केले की, पीडितेची साक्ष, पतीची जबानी आणि वैद्यकीय अहवाल हे आरोपीला दोषी ठरवण्यासाठी पुरेसे आहेत. "एका महिलेविरुद्ध केलेला हा गंभीर गुन्हा आहे," असे नमूद करत न्यायालयाने त्याला सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच, पीडितेच्या पुनर्वसनासाठी आर्थिक मदत देण्याचे आदेशही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले आहेत
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 11:46 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
वहिनीला चहा बनवायला सांगितला; मग हळूच मागे किचनमध्ये गेला अन् धक्कादायक कांड, दिराला आता घडली अद्दल








