Baramati Lok Sabha Result 2024 : अजितदादांना धक्का! पवार ठरले भारी, सुप्रिया सुळेंची जोरदार आघाडी
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
आता बारामती मतदारसंघातील निकालाचा पहिला कल हाती आला आहे. यानुसार, अजितदादांना मोठा धक्का बसला असून सुप्रिया सुळेंनी बारामतीत जोरदार आघाडी घेतली आहे
बारामती : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली . शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार मैदानात उतरल्या. आता बारामती मतदारसंघातील निकालाचा पहिला कल हाती आला आहे. यानुसार, अजितदादांना मोठा धक्का बसला असून सुप्रिया सुळेंनी बारामतीत जोरदार आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
ननंद-भावजय, मुलगी-सून, राष्ट्रवादीचे दोन गट तसंच महाआघाडी आणि महायुती अशी ही लढत. त्यामुळे या लढतीकडे फक्त राज्यच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार यांच्यासोबत भावनिकरित्या जोडलेले आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे. प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता.
advertisement
बारामती विधानसभा मतदारसंघात 2 लाख 56 हजार 531 इतकं मतदान झालं आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात 1 लाख 83 हजार 658 मतदान झालं आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात मतदान 2,17,173 मतदान झालं आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण मतदान 2,31,679 मतदान झालं आहे. भोर विधानसभा मतदारसंघात एकूण 2,45,215 मतदान झालं आहे. तर सगळ्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात 2 लाख 77 हजार 365 मतदान झालं आहे.
advertisement
राष्ट्रवादी पक्षात फुटीनंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक. शरद पवार आणि अजित पवार, एकाच घरातील दोन सदस्यांमध्ये झालेली ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 04, 2024 8:28 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Baramati Lok Sabha Result 2024 : अजितदादांना धक्का! पवार ठरले भारी, सुप्रिया सुळेंची जोरदार आघाडी