49 स्पर्धक, 30 वर्षांची परंपरा, पुण्यात पालिकेकडून राबवली जातेय किल्ले बनवण्याची स्पर्धा, VIDEO

Last Updated:

fort making competition pune - किल्ल्याच्या माध्यमातून आपला इतिहास हा दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. यंदाचे या उपक्रमाचे हे 30 वे वर्ष आहे. याठिकाणी 50 हुन अधिक किल्ले हे बनवलेले आहेत.

+
किल्ले

किल्ले बनवण्याची स्पर्धा पुणे

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे :  गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिकेच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धा व प्रदर्शन आयोजित केले जात आहे. शालेय विद्यार्थी आणि युवक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. तसेच ज्येष्ठ नागरिक, गृहिणीदेखील किल्ले बनवताना आपला सहभाग नोंदवतात. किल्ल्याच्या माध्यमातून आपला इतिहास हा दुसऱ्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. यंदाचे या उपक्रमाचे हे 30 वे वर्ष आहे. याठिकाणी 50 हुन अधिक किल्ले हे बनवलेले आहेत.
advertisement
पुणे महानगरपालिका, उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाच्यावतीने 30 वर्षांपासून दिवाळीच्या निमित्ताने किल्ले स्पर्धा आयोजित केली जाते. वाढत्या शहरीकरणामुळे, राहणीमानात झालेल्या बदलामुळे मुलांना किल्ले करण्यासाठी उपलब्ध होणारी अपुरी जागा असल्याने, मुलांना जागा उपलब्ध करून आपल्याकडे असलेल्या गडकोट किल्ल्यांचा पुन्हा अभ्यास करता यावा, त्याबाबत मुलांच्या मनात आवड निर्माण व्हावी, इतिहास भुगोलाची आवड वृध्दींगत व्हावी तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे या उद्देशाने पुणे महानगरपालिका प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करीत आहे.
advertisement
6 नोव्हेंबरपर्यंत या किल्ल्यांच्या प्रतिकृती पाहता येणार आहे. यावर्षी किल्ले स्पर्धा व प्रदर्शनामध्ये एकूण 49 स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे. या स्पर्धेमध्ये जंजिरा, बाणकोट, रवदुर्ग, रायगड, नळदुर्ग, विजयदुर्ग, हडसर, पद्मदुर्ग, अजिंक्यतारा, शिवनेरी, पन्हाळगड, देवगड, सालेर, पुरंदर, कुलाबा, राजगड, सिंहगड, प्रतापगड, लोहगड, सिंधुदुर्ग, इ. किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आलेल्या आहेत.
advertisement
किल्ल्यांबाबतच्या अधिक माहितीसाठी किल्ल्यांचे नकाशे, किल्ल्यांवर व पर्यावरणावर आधारित घोषवाक्य इत्यादी माहिती सदरचे किल्ले पाहाताना बघायला मिळतात, अशी माहिती पुणे महानगरपालिका मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/पुणे/
49 स्पर्धक, 30 वर्षांची परंपरा, पुण्यात पालिकेकडून राबवली जातेय किल्ले बनवण्याची स्पर्धा, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement