Gajya marane : कुख्यात गँगस्टर गजा मारणे परत आला, दहीहंडीत चंद्रकांत पाटलांना भेटला

Last Updated:

कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दही हंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. गजा मारणेने चंद्रकांत पाटलांचा सत्कार केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील वादात सापडणार? गुंड गजा मारणेला भेटले, सत्कारही स्वीकारला
चंद्रकांत पाटील वादात सापडणार? गुंड गजा मारणेला भेटले, सत्कारही स्वीकारला
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दही हंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. गजा मारणेने चंद्रकांत पाटलांचा सत्कार केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास आहे. तर चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूडमधून निवडणूक लढवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांची तयारी सुरू आहे.
advertisement
कोथरूड भागातील किनारा हॉटेल जवळ हमराज नावाचं सार्वजनिक उत्सव मंडळ आहे तिथं गजा मारणे दरवर्षी येतो त्याच ठिकाणी मंञी चंद्रकांत पाटील यांनी गजा मारणे याच्या हस्ते सत्कार स्वीकारला. विशेष म्हणजे चंद्रकांत दादा यांच्या नियोजित दौऱ्यात या गजा मारणे समर्थक मंडळाचा आधी कुठेही समावेश नव्हता. मग तरीही दादा ऐनवेळी तिकडे कसे गेले? की कुणी त्यांना ठरवून तिकडे नेलं. विशेष म्हणजे गजा मारणेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही दादांनी त्याच्याकडून सत्कार का स्वीकारला? असा प्रश्न उपस्थित होतोय.
advertisement
मागच्याच वर्षी पुण्याचा कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या पक्ष प्रवेशावेळीही चंद्रकांत पाटलांवर टीका करण्यात आली होती.
गजा मारणे- पार्थ पवार भेट
याआधी गजा मारणेने अजित पवारांचे पूत्र पार्थ पवार यांची भेट घेतली होती, त्यावेळीही मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर अजित पवारांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. पार्थने घेतलेली गजा मारणेची भेट हे अतिशय चुकीचं झालं आहे. पार्थ ज्या घरी गेला होता तिकडे गजा मारणे आला होता. माझ्यासोबतही असाच प्रकार घडला होता, आता मात्र मी याबाबत काळजी घेतो, पोलिसांना आधीच सांगून ठेवतो, असं अजित पवार म्हणाले होते.
advertisement
लंकेही मारणेला भेटले
काहीच दिवसांपूर्वी पुण्यामध्येच गजानन मारणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांचीही भेट झाली होती, त्यावरूनही वाद झाला होता. अखेर निलेश लंके यांना या भेटीप्रकरणी माफी मागावी लागली होती.
दिल्लीहून येत असताना पुण्यात काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी भेट घेण्यासाठी आलो होतो. परत येत असताना माझी गाडी पाहून त्या व्यक्तीने हात केला. साहेब मी इथेच रहातो चहा घेण्यासाठी चला म्हणून मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी घरी गेल्यावर माझा सत्कार केला परंतु ती व्यक्ती कोण आहे याची मला कल्पना मला नव्हती. आज सकाळी काही प्रसार माध्यमांतून कळाले की तो गजा मारणे होता, त्याची मला पार्श्वभूमी माहीत नसल्यामुळे आणि अशा व्यक्तीच्या घरी जाणं ही चूकच असल्याचं खासदार निलेश लंके म्हणाले होते.
मराठी बातम्या/पुणे/
Gajya marane : कुख्यात गँगस्टर गजा मारणे परत आला, दहीहंडीत चंद्रकांत पाटलांना भेटला
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement